Loksabha Election News: भाजप-शिंदे गट आमनेसामने; दिनकर पाटलांचे खासदार गोडसेंना थेट आव्हान

BJP Vs Hemant Godse : खासदार हेमंत गोडसे नाशिक लोकसभा मतदारसंघाचा अपेक्षित विकास करू शकले नाही.
Hemant Godse & Dinkar Patil
Hemant Godse & Dinkar PatilSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : गेल्या दहा वर्षात नाशिक लोकसभा मतदारसंघात विविध गावे विकासापासून वंचित राहिली आहेत. रस्ते तर अजिबात नाहीत. त्यामुळे लोक आमच्याकडे येत असतात. मित्र पक्षाचे असले तरी खासदारांनी अपेक्षित कामे केलेली नाहीत, अशी टीका भाजप नेते आणि माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी केली आहे.

दिनकर पाटील यांच्या पाठपुराव्याने नाशिक तालुक्यातील १८ गावांना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गावांच्या सरपंचांशी दिनकर पाटील यांनी चर्चा केली. विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध असून लोकांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल असे पाटील म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Hemant Godse & Dinkar Patil
Vasant More News: " गटनेते अन् शहराध्यक्षपद दिले; आता इच्छाच असेल तर..."; मोरेंचं सूचक विधान

पाटील भारतीय जनता पक्षातर्फे आगामी लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आहेत. पाटील म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून मी मतदार संघाचा दौरा करीत आहे. पक्षाने सूचना केल्याप्रमाणे निवडणुकीची तयारी करीत आहे. सबंध मतदार संघातून नागरिक विकासासाठी आमच्याकडे संपर्क करतात. याचाच अर्थ अपेक्षित विकास झालेला नाही हे स्पष्ट होते, अशी टीका पाटील यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचा नामोल्लेख टाळून केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी भाजप कडून उमेदवारीचे रणशिंग फुंकले आहे. या दृष्टीने त्यांच्या वक्तव्याकडे पाहिले जात आहे. दिनकर पाटील यांनी महायुतीचे खासदार असूनही गोडसे यांनी नाशिक सिन्नर त्रंबकेश्वर आणि इगतपुरी या चार तालुक्यांसाठी विकासाची कामे केलेली नाहीत. विशेषता रस्ते अतिशय खराब आहेत त्याचा शेतकरी आणि नागरिकांना खूप त्रास होतो. भाजपचा खासदार झाल्यास या सर्व समस्यांचे निराकरण होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Hemant Godse & Dinkar Patil
Sanjay Raut On Seat Allocation : 'जिंकेल त्याची जागा', संजय राऊतांनी सांगितले जागावाटपाचे सूत्र !

महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप असे तीन घटक आहेत. त्यांच्यामध्ये चांगला समन्वय असल्याचे भाजपकडून सातत्याने सांगितले जाते. दुसरीकडे मात्र भाजपने शिंदे गटाचे खासदार असलेल्या मतदारसंघातच विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. नाशिकमध्ये दिनकर पाटील यांनी सुरू केलेल्या दौरा या दृष्टीने शिंदे गटाची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

Hemant Godse & Dinkar Patil
Sanjay Raut On Ayodhya : 'भाजपकडून प्रभू श्रीरामालाच निवडणुकीत उभं करण्याचं बाकी'; राऊतांनी पुन्हा डिवचलं!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com