Congress leader and former minister Sunil Kedar during a public interaction as his party faces significant losses in Nagpur district municipal council elections. Sarkarnama
विदर्भ

Sunil Kedar : भाजपकडून सुनील केदार यांचे वर्चस्व मोडित : सावनेरमध्ये काँग्रेसने चारपैकी 3 नगर परिषदा गमावल्या

Nagpur elections : नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांत काँग्रेस नेते सुनील केदारांना मोठा धक्का बसला असून चारपैकी तीन नगर परिषदांमध्ये भाजपने सत्ता काबीज केली आहे.

Rajesh Charpe

Nagpur politics : काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदारांना धक्क्यावर धक्के बसत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सावनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी पराभूत झाल्या होत्या. आता त्यांनी सावनेरमधील 4 पैकी 3 परिषदा गमवल्या आहेत. एवढेच नव्हे तर केदारांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा विरोध झुगारून नगराध्यक्षपदासाठी निवडलेले सर्वच उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यांचे नेतृत्व व निर्णयावरही शंका घेतली जात असून ही केदारांसाठी धोक्याची घंटा मानली जाते.

बँक घोटाळ्यात 5 वर्षांची शिक्षा झाल्याने सुनील केदार यांच्या आमदारकीवर गंडातर आले होते. त्यानंतरही लोकसभा निवडणुकीत केदारांनी काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांना एकहाती निवडून आणले. त्यामुळे त्यांचे पक्षात चांगलेच वजन वाढले होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर केदारांनी नागपूर जिल्ह्यातील सर्व सूत्रे आपल्या हाती घेतले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी पत्नीला उमेदवारी दिली. पण त्यांचा भाजपचे आशिष देशमुख यांनी पराभव केला. पण लोकसभा निवडणुकीपासून त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला.

आता मात्र अति धाडस करणे केदार यांच्या अंगलट आहे. सावनेर विधानसभा मतदारसंघातंर्गत येणाऱ्या सावनेर, कळमेश्वर, खापा आणि मोहपा या 4 नगरपरिषदांपैकी काँग्रेसला फक्त मोहपा येथे विजय मिळाला आहे. येथून काँग्रेसचे माधव चर्जन निवडून आले आहेत. सावनेर शरह केदार यांचा गड मानला जात होता. मात्र सावनेर नगर परिषदेत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संजय मंगळे, खापा नगर परिषदेतून पियुष बोरडे आणि कळमेश्वरमधून भाजपचे अविनाश माकोडे विजयी झाले आहेत.

नगर पालिका आणि नगर परिषद घोषित झाल्यानंतर केदारांचे कट्टर समर्थक असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आश्विन बैस यांनी परस्पर मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या मुलाखतीच्या बैठकीला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना नियुक्त केलेल्या निवड मंडळाला बोलावण्यात आले नव्हते. याची तक्रार अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे केली होती.

त्यानंतर निवडणूक निरीक्षक यांना तातडीने नागपूरला पाठवण्यात आले होती. त्यांनी हा मुलाखतीचा कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही केदारांनी मुलाखती घेऊन थेट प्रदेशाध्यक्षांनाच आव्हान दिले होते. दुसऱ्या दिवशी प्रदेशाध्यक्षांनी केदारांच्या उपस्थित झालेल्या मुलाखती आणि बैठक अवैध ठरवली तसेच नव्याने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सांगितले होते. मात्र दुसऱ्या दिवशी घेण्यात आलेल्या मुलाखतीला केदारांच्या समर्थकांनी दांडी मारली होती.

सरतेशेवटी जिल्ह्याचे नेतृत्व व उमेदवारांची निवड केदारांच्याच हाती सोपवण्यात आली होती. त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या मर्जीचे उमेदवार टाकले. वाडी नगर परिषदेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला एबी फॉर्म दिला तर बुटीबोरी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्याला केदारांनी पाठिंबा जाहीर केला होता. मात्र त्यांचे सर्व प्रयोग फसले. त्यांनी दिलेले मोहपा नगर परिषदेचा उमेदवार वगळता सर्वच पराभूत झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT