Shivsena Vs Shivsena UBT : विजयानंतर तासाभरातच पक्ष सोडणार : ठाकरेंचा नगराध्यक्ष करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Shivsena Vs Shivsena UBT : नगरपालिका निकाल जाहीर होताच श्रीवर्धन नगरपालिकेचे उबाठा नगराध्यक्ष अतुल चौगुले शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
Shrivardhan Nagarpalika Nagardhyaksha Atul Chaugule, who won as Shiv Sena UBT candidate, set to join Eknath Shinde-led Shiv Sena.
Shrivardhan Nagarpalika Nagardhyaksha Atul Chaugule, who won as Shiv Sena UBT candidate, set to join Eknath Shinde-led Shiv Sena.Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena Vs Shivsena UBT : राज्यातील नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच तासाभरात पहिले पक्षांतर होत आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी विजयी झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अतुल चौगुले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारीच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. मंत्री भरत गोगावले यांनी तासाभरताच उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का दिला आहे.

स्वतः मंत्री गोगावले आणि अतुल चौगुले यांनी शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना दुजोरा दिला आहे. मंत्री गोगावले म्हणाले, आमच्या शिवसेनेने पूर्ण ताकदीने अतुलला मदत केली. त्याला आम्ही केलेली मदत तो आयुष्यभर विसरणार नाही. त्याचीही मानसिकता आहे, आम्ही वरिष्ठांसोबत चर्चा करू. तर चौगुले यांनीही सर्वपक्षीयांचे आभार मानले. मंत्री भरत गोगावले, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ग्राऊंड लेव्हलच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मदत केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com