Sunil kedar Sarkarnama
विदर्भ

Sunil Kedar News : तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेल्या सुनील केदारांचे पोस्टर झळकले; काँग्रेस महारॅलीत कट्टर समर्थकांचा..

Congress Maharally Nagpur News : केदार रुग्णालयात, पोस्टर नागपुरात..

Chetan Zadpe

Nagpur News : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने ५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्याने आजच्या नागपूर येथे काँग्रेसच्या महारॅलीला माजी मंत्री सुनील केदार उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र केदार यांच्या समर्थकांनी बॅनर आणि होर्डिंग्ज्स लावले आहेत. यामुळे काँग्रेसच्या महारॅलीला सुनिल केदार पोहचू शकणार नसले तरी, त्यांचे मोठे मोठे बॅनर लक्ष वेधून घेत असल्याने, चर्चांना उधाण आले आहे. (Latest Marathi News)

काँग्रसेचे नेते सुनिल केदार यांना मास लीडर म्हणून ओळखले जाते. मात्र केदार यांना आजच्या काँग्रेस महारॅलीला उपस्थित राहता येणार नाही. २२ डिसेंबर रोजी न्यायालयाने बँक घोटाळा प्रकरणात केदार यांना शिक्षा सुनावली आहे. सद्या ते नागपूरमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. न्यायालयाने त्यांना अद्यापपर्यंत जामीन दिलेला नाही. मात्र, महारॅलीच्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी बॅनर लावून त्यांना पाठिंबा दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपुरात आजा काँग्रेस स्थापना दिनानिमित्त पक्षाकडून महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसच्या नेत्या अवंतिका रमेश लेकुरवाळे यांनी केदार यांचे पोस्टर लावले आहे. केदार यांच्या समर्थनासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पोस्टरबाजी केली आहे. सुनील केदार पुन्हा लवकरच सार्वजनिक जीवनात सक्रीय व्हावेत, अशी आशा या पोस्टरमधून व्यक्त केली जात आहे.

सुनील केदारांची आमदारकी रद्द -

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा सहकारी बँक (NDCC) घोटाळा प्रकरणात दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली. यानंतर सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सुनील केदारांना मोठा धक्का बसला आहे.

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी न्यायालयाचे आदेश विधिमंडळाला पाठवले होते. यानंतर सुनील केदारांची आमदारकी रद्द करण्यात आली. कोणत्याही खटल्यात दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते. केदार यांना झालेल्या शिक्षेचा कालावधी पाच वर्षांचा असल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT