Sunil Kedar News : काँग्रेसने घोटाळेबाज केदार यांची हकालपट्टी का केली नाही? भाजपचा हल्लाबोल; ठाकरे गटाला वेगळाच संशय

Sunil Kedar Latest News : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक घोटाळ्यात काँग्रेस नेते सुनील केदार अडकले...
Sunil Kedar
Sunil KedarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political Latest News : काँग्रेसचे नागपूर जिल्ह्यातील दिग्गज नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक (NDCCB) घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे विदर्भात काँग्रेसला हा मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. या प्रकरणामुळे एकीकडे सुनील केदार यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपने काँग्रेसला घेरले आहे.

Sunil Kedar
Nagpur NDCCB Bank : सुनील केदार यांच्या आमदारकीचा निर्णय नार्वेकरांच्या 'कोर्टात'

काँग्रेसने सुनील केदार यांची हकालपट्टी का केली नाही? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. नागपूर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून कोट्यवधींचा लूटमार करण्यात आली. म्हणून 5 वर्षांची शिक्षा झाली. सुनील केदार यांची हकालपट्टी काँग्रेस वरिष्ठांनी अजूनपर्यंत का केली नाही? असा सवाल सोमय्यांनी केला आहे. 2001-2002 चा हा घोटाळा आहे. यामुळे सुनील केदार यांची आमदारकी रद्द करावी. तर काँग्रेस नेते त्यांच्यावर कधी कारवाई करणार? असा सवालही किरीट सोमय्यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गटाने व्यक्त केला संशय

न्यायालयावर दबाव असल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच कारवाई होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. भाजपचे असे अनेक नेते आहेत , ज्यांच्यावर असे खटले चालवून अशा प्रकारच्या शिक्षा ठोठावल्या पाहिजे. पण सध्या न्यायालयावर ज्या प्रकारचा दबाव आहे त्यामुळे विरोधी पक्षातल्या नेत्यांना समन्स येतील. विरोधी पक्षातल्या नेत्यांनाच अटक होईल आणि विरोधी पक्षातल्या लोकांच्या खासदारक्या रद्द होतील. त्यामुळे सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा ठोठावली आणि त्यांच्या आमदारकीवर तलवार लटकवली याचे आम्हाला आश्चर्य वाटत नाही. पण सुनील केदार हे लढवय्ये नेते आहेत. संपूर्ण महाविकास आघाडी आणि खासकरून शिवसेना सुनील केदार यांच्याबरोबरीने लढत राहील. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

Edited by Sachin Fulpagare

Sunil Kedar
Nagpur NDCCB Bank : शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच सुनील केदार आजारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com