Sunil Tatkare Sarkarnama
विदर्भ

Sunil Tatkare News : 'चिन्ह तेच, विचार तेच, नवीन पर्व सुरू, 2 जुलैचा निर्णय अचानक नव्हता; तटकरेंचे सूचक वक्तव्य

NCP News : 2 जुलैचा घेतलेला निर्णय हा अचानक नव्हता.

अतुल मेहरे

Nagpur News : निर्धार नवीन पर्वाचा राज्यव्यापी दौरा करत आहे, पक्षाने घेतलेली भूमिका गावपातळीवर पोहाेचवणे, संघटनबांधणी करणे, घड्याळ चिन्ह तेच, विचार तेच, नवीन पर्व महाराष्ट्रच्या राजकारणात सुरू असून, त्याचे महत्त्वाचे घटक आम्ही आहेत, भाजप सोबत जाताना अनेकांनी टीका केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कौल भाजप आणि शिवसेनेला (Shivsena) जनतेने दिला होता. मुख्यमंत्री पदावरून मतभेद झाले. कोरोनाच्या काळात अजित पवार एकमेव नेते म्हणून मंत्रालयात जाऊन काम करत होते, असे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगतिले.

भाजपने (BJP) पाठिंबा मागितला नसताना 2014 मध्ये राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. त्यामुळे 2 जुलैला घेतलेला निर्णय हा अचानक नव्हता. हेच यातून सांगायचे आहे. विचारांशी तफावत न करता सरकारमध्ये सामील झालो, असे मतही तटकरे यांनी नागपूरमध्ये बोलताना व्यक्त केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न उद्भवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले, पण सुप्रीम कोर्टात टिकू शकले नाही. सरकारच्या विनंती मान्य करत जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतले. सर्वताेपरी यंत्रणा लावून आरक्षण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे तटकरे म्हणाले.

रविवारपासून पूर्व विदर्भाच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. दिवाळीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करणार आहे. राष्ट्रवादी पक्ष प्रभावीपणे निभावेल. लवकरच विधानसभेचे निवडणुकीचे वेध लागतील, असेही त्यांनी सांगितले. खासदार सुप्रिया सुळे महासंसद रत्न असा का उल्लेख करतात मला माहीत नाही... माझा एखादा व्यक्ती म्हणून उल्लेख करणे भूषणावह नाही. त्यांचा काय राग आहे, मला माहीत नाही. दिल्लीत सुनावणी असताना संताप अनावर झाला. माझी नियत साफ असल्याचे त्यांनी सांगितले.

आज संघटनेच्या दौऱ्यावर आहे, त्यामुळे सरकारकडून न्याय मिळणे आवश्यक असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझा सहयोग मिळावा म्हणून भेट घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडून आणायची गुणवत्ता पाहून आम्ही लढणाऱ्या जागेवर 100 टक्के जिंकू, विधिमंडळ स्वायत्त आहे, आर्टिकल 226 खाली उच्च न्यायालय कायदेशीर निर्णय घेण्यात अधिकार सुप्रीम कोर्टाला अंतिम असेल, असेही त्यांनी सांगितले.

जागावाटप करताना महायुतीत चर्चेत प्रथमिक सूत्र ठरेल, धोरण अजून ठरले नाही. दोन्ही तिन्ही पक्षांचे नेते मिळून ठरवू. मराठा आरक्षण देण्याची भूमिका कोणाची आहे हे जनतेला माहीत आहे. निवडणुकीचा कालावधी सुरू होईल तेव्हा सकल मराठा समाजाला भूमिका कळेल, आरक्षण दिले पाहिजे, आज निवडणुकीच्या काळात यश मिळेल, असेही ते म्हणाले.

आज अनेक आव्हान आमच्या पक्षासमोर आहेत. आम्ही सोबत लढून जागा जिंकू, ज्यावेळी आघाडीतील पक्ष बसतात, तेव्हा जागावाटपासंदर्भात निर्णय होईल. एसटी कामगारांचे प्रश्न आहे, ते सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. नव्याने आलेल्या अनेक योजना आहेत, सरकार ते प्रश्न सोडवेल. सत्तेत सहभागी होऊन काही जास्त दिवस झाले नाही. जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे ? अशी विचारणा त्यांच्याकडे केली असता, हा संवेदनशील विषय आहे, त्यामुळे जास्त भाष्य करणार नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT