Mumbai News: राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंनी महायुतीच्या आमदार, खासदारांचीही बैठक बोलावत काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुका महायुतीतच लढवायच्या असून आपल्या सर्वांमध्ये समन्वय ठेवा, अशा सूचना दिल्या. त्याबरोबरच मराठा आरक्षणाबाबत मंत्रालयात सत्ताधारी आमदारांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी बोलून दाखवली असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षातील आमदारांनी मंत्रालयाबाहेर गुरुवारी आंदोलन केले होते. यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. मंत्रालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या आमदारांमध्ये अजित पवार गटाच्या आमदारांचा सहभाग होता.
यावरूनच मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत "सत्तेत असताना अशी आंदोलन करणं योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनीच आंदोलन केल्यास जनतेत चुकीचा मेसेज जाऊ शकतो, अशा आंदोलनामुळे महायुतीत समन्वय नसल्याचा मेसेज जाऊ शकतो. महायुती म्हणून आपण सर्वांनी अशा परिस्थितीत एकत्र राहायला हवं", असे सांगत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले असले तरी सरकारला दोन महिन्यांचा वेळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे आरक्षणासारख्या गुंतागुंतीच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी सरकार आता वेगाने हालचाली करत आहे. यासाठी स्वतः मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर आले असल्याचे दिसून येत आहे.
Edited by Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.