BJP, Congress  Sarkarnama
विदर्भ

Congress Vs BJP: सर्वोच्च न्यायालयाचा काँग्रेस आमदाराला मोठा धक्का,भाजपच्या पराभूत उमेदवाराला दिलासा; निकाल फिरणार?

Vidarbha Politics: विदर्भातील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,उद्धव ठाकरेंची शिवसेना तसेच अपक्ष उमेदवारांनी अनेक पराभूत उमेदवारांनी निवडून आलेल्या आमदाराविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. यात मुख्यत्वे आघाडीच्या तसेच भाजपविरुद्ध लढलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. पण काँग्रेसच्या विजयी उमेदवाराविरोधात भाजपकडून दाखल करण्यात आलेली ही एकमेव याचिका आहे.

Deepak Kulkarni

Akola News: अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार विजय अग्रवाल यांनी काँग्रेसचे विजयी उमेदवार साजिद खान पठाण यांच्यावर निवडणुकीत गैरमार्गाने निवडून आल्याचा धक्कादायक आरोप केल्यानं खळबळ उडाली होती. तसेच अग्रवाल यांनी काँग्रेसचे साजिद पठाण यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती.

भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांनी काँग्रेसचे साजिद पठाण यांच्यावर अनेक ठिकाणी ‘डबल व्होटिंग’ अर्थात एकाच मतदाराचं दोनदा मतदान घडवून आणल्याचा आरोप करत याचिका दाखल केली होती.

हीच याचिका फेटाळून लावण्यासाठी पठाण यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष अनुमती याचिका मंगळवारी नामंजूर करण्यात आली आहे. हा पठाण यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून 10 जुलै 2026 रोजी काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना मोठा दणका बसला होता. न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी ही याचिका गुणवत्ताहीन ठरवली होती. यानंतर साजिद पठाण यांनी भाजपच्या विजय अग्रवाल यांच्या याचिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ व संदीप मेहता यांनी साजिद खान पठाण यांच्या याचिकेवर निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं स्पष्ट करत विशेष अनुमती याचिका मंगळवारी नामंजूर केली आहे.

विदर्भातील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,उद्धव ठाकरेंची शिवसेना तसेच अपक्ष उमेदवारांनी अनेक पराभूत उमेदवारांनी निवडून आलेल्या आमदाराविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. यात मुख्यत्वे आघाडीच्या तसेच भाजपविरुद्ध लढलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. पण काँग्रेसच्या विजयी उमेदवाराविरोधात भाजपकडून दाखल करण्यात आलेली ही एकमेव याचिका आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT