

Central Armed Police Forces update : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील देशातील केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात हजारो पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसभेतील काही सदस्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना बुधवारी (ता. २९) केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सीआरपीएफ, बीएसएफ अशा सहा सशस्त्र पोलीस दलातील मंजूर पदे आणि रिक्त पदांची माहिती दिली आहे.
देशामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP), सशस्त्र सीमा दल (SSB) आणि आसाम रायफल्स (AR) ही सहा केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहेत. नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, या सहा दलांमध्ये एकूण ६१ हजार ७३८ पदे रिक्त आहेत.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या माध्यमातून देशांतर्गत सुरक्षेवर करडी नजर ठेवली जाते. दिल्लीत नुकत्याच झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते. देशांतर्गत सुरक्षेसाठी सीआरपीएफ हे दल सर्वात मोठे आहे. या दलासाठी एकूण ३ लाख ३० हजार ८४१ पदे मंजूर असून त्यापैकी १८ हजार १३४ पदे रिक्त आहेत.
CRPF या दलापाठोपाठ सीमा सुरक्षा दलासाठी २ लाख ७१ हजार ९९७ पदे मंजूर असून त्यापैकी ५ हजार ८७४ पदे रिक्त आहेत. सीआयएसफमध्ये १७ हजार ९३० पदे रिक्त आहे. या दलासाठी एकूण २ लाख ५४८ पदे मंजूर आहेत. आयटीबीपी दलातही १० हजार ६८८ पदे रिक्त असून या दलामध्ये एकूण मंजूर पदांची संख्या १ लाख ५ हजार १४८ एवढी आहे.
सशस्त्र सीमा दलामध्ये ६ हजार ६३८ तर आसाम रायफल्समध्ये २ हजार ४७४ पदे रिक्त आहे. या दोन्ही दलांसाठी अनुक्रमे १ लाख ५३९ आणि ६४ हजार ६५५ पदे मंजूर आहेत. या सहा दलांसाठी एकूण मंजूर पदांची संख्या १० लाख ७३ हजार ७२८ एवढी आहे. तर १० लाख ४ हजार ४८२ पदांवर भरती झालेली आहे. दरम्यान, नित्यानंद राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरती प्रक्रिया निरंतर सुरू असल्याची माहिती राज्यसभेत दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.