Nagpur News : राष्ट्रवादी काँग्रेसचा विकासाला कधीच विरोध नसतो. तो आम्ही आजवर केला नाही. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यामार्फत निर्माण होत असलेल्या रस्त्यांना आमता पाठींबाच दिला आहे. त्यामुळे आम्ही विरोधात आहोत म्हणून विरोधासाठी विरोध करतो हा भाजपचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी फेटाळून लावला.
भक्ती मार्गाला मात्र आमचा ठाम विरोध आहे. या मार्गाच्या निर्मितीवर कोट्यवधींचा खर्च होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती डबघाईस येण्याचा धोका अर्थतज्ञांनी व्यक्त केला असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
भक्तीमार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. त्यांची सुपीक जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शेतकरी व नागरिकांचा विरोध बघून महायुती सरकारने तो रद्द केल्याचे जाहीर केले होते. तसा शासनादेश काढला होता. तो आदेश दाखवून महायुतीच्या नेत्यांनी जनतेची मते मागितली होती. सत्तेवर येतात या सरकारने पुन्हा आपलाच आदेश फिरवला.
भक्तीमार्ग अत्यंत गरजेचा नाही. आधीच एक प्रशस्त मार्ग उपलब्ध आहे,असे असताना कोट्यवधी खर्च करून आणखी एक नवा मार्ग उभारला जात आहे. भक्ती मार्गासाठी 82 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. इतर वित्तीय संस्था 6.3 टक्क्यांनी व्याजदरावर कर्ज देत आहे. मात्र, या मार्गासाठी 8.8 टक्के व्याजदराने कर्ज घेण्यात येणार आहे. या कर्जाच्या रकमेमुळे अर्थसंकल्पातील एकूण 22 टक्के वाटा कर्जाची परतफेडीसाठी द्यावा लागणार आहे.
अटलबिहारी बाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनीच फिस्कल मॅनेजमेंट ॲक्ट लागू केला होता. त्यानुसार तीन टक्क्यांच्या आत फिस्कल रेट ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, या मार्गामुळे तो चार टक्क्यांच्यावर जाणार आहे. हे आम्ही नाही म्हणत तर अर्थतज्ञ म्हणतात. महायुतीच्या सरकारमधील अर्थखात्यानेही हेच म्हटले आहे. कॅबिनेटच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे.
याच सरकारमधील मंत्र्यांचा खर्चावरून भक्ती महामार्गाला विरोध आहे याकडे सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधले. आम्हाला विरोध करायचा असता तर सर्वच मार्गांना केला असता. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फतही मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहे. त्याला कुठे आमचा विरोध आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.