MP Supriya Sule  Sarkarnama
विदर्भ

जिजाऊ जन्मस्थळाच्या राष्ट्रीय स्मारकासाठी लोकसभेत मागणी करणार: सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे (supriya Sule) सिंदखेड राजा (sindkhed Raja) येथे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शहरातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन पाहणी केली.

सरकारनामा ब्युरो

गजानन काळुसे

बुलडाणा : ''राज्यातील पर्यटन वाढवण्यासाठी ऐतिहासिक वास्तूचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभाग व राज्य पुरातत्व विभाग या दोघांनी लक्ष घातले पाहिजे,'' अशी भुमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मांडली. सुप्रिया सुळे मातृतीर्थ सिंदखेड राजा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शहरातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन पाहणी केल्यानंतर आपले म्हणणे मांडले.

या दौऱ्यात त्यांनी शहरातील ऐतिहासिक मोती तलाव, रामेश्वर मंदिर, रंगमहाल काळा कोट, सावकार वाडा ,राजमाता जिजाऊ जन्मस्थळ, राजे लखोजीराव जाधव समाधी, निळकंठेश्वर मंदिर, पुतळा बारव, चांदणी तलाव यांना भेट देत तेथील माहिती जाणून घेतली. जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी,ॲड. संदीप मेहेत्रे व विजय तायडे यांनी त्यांना या ऐतिहासिक स्थळांची माहिती सांगितली. ऐतिहासिक स्थळांच्या पाहणीनंतर पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी या ऐतिहासिक स्थळांच्या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली.

त्यांच्या या दौऱ्यामुळे ऐतिहासिक स्थळाच्या रखडलेल्या कामांना गती मिळणार असल्याचे दिसते. बैठकीत बोलताना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, सिंदखेड राजा मध्ये असलेल्या ऐतिहासिक व सुंदर अशा वास्तू आहेत. यांच्या देखीरेखीचे काम केंद्रीय पुरातत्व विभाग व राज्य पुरातत्त्व विभाग यांच्या माध्यमातून सुरू आहे.परंतु कोरोनाच्या कालखंडात कामे थांबली होती. सुप्रियाताई सुळे यांनी ऐतिहासिक सर्व वास्तूंची पाहणी केल्यानंतर या वास्तूंच्या रखडलेल्या कामांना सुरुवात होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ऐतिहासिक वास्तूचे महत्व नष्ट होऊ नये या दृष्टीने काम पुर्ण करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.

- राष्ट्रीय स्मारकासाठी करणार पाठपुरावा

राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ हे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी आपण लोकसभेमध्ये मागणी करणार आहे. तसेच, त्यासाठी लागणाऱ्या गोष्टीची पूर्तता करणार असल्याची माहितीही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

- तात्काळ निधी मंजूर करण्याची गरज

त्याचबरोबर, रंगमहल, काळा कोट, सावकार वाडा, निळकंठेश्वर महादेव मंदिर, आणि लखोजीराव जाधव राजवाडा या ऐतिहासिक स्थळांच्या कामासाठी राज्य पुरातत्व विभागाअंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे. या स्थळांचे काम २०१८ मध्ये संबधीत ठेकेदारकडुन कुशल कारागीरांच्या माध्यमातून काम सुरू करण्यात आले.मात्र ठेकेदाराचे ४.१० कोटी रुपये थकल्यामुळे रखडलेली कामे कशी सुरु करावी असा प्रश्न आहे. त्यासाठी तात्काळ निधी मंजूर होणे गरजेचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT