Satyajeet Tambe, Nana Patole and Prakash Ambedkar
Satyajeet Tambe, Nana Patole and Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Satyajeet Tambe यांचे निलंबन? नाना पटोलेंची चुप्पी; म्हणाले मी बोलू शकत नाही !

सरकारनामा ब्यूरो

Nashik Graduate Constituency Election : नाशिक (Nasik) पदवीधर मतदारसंघात युवक कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कधी नव्हे त्या अभूतपूर्व घडामोडी आतापर्यत घडल्या. रोज नवे ट्विस्ट येथे बघायला मिळाले. आजही सकाळपासून शुभांगी पाटील नॉट रिचेबल असल्यामुळे हा मतदारसंघ चर्चेत राहिला. दरम्यान सत्यजीत तांबे यांना कॉंग्रेस निलंबित करणार असल्याची माहिती आहे.

सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या निलंबनाबाबत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना विचारले असता, सत्यजीत तांबे यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा, हा हायकमांडचा अधिकार आहे. मी त्यावर बोलू शकत नाही. असे म्हणत तांबे यांच्या निलंबनावर त्यांनी चुप्पी साधली आहे. तांबे पिता-पुत्राने काॅंग्रेस (Congress) पक्षासोबत दगाफटका केला आहे. त्यांच्याबाबतीत हायकमांड काय तो निर्णय घेतील, असे नाना पटोले यांनी यापूर्वीसुद्धा सांगितलेले आहे.

आज कॉंग्रेस सत्यजीत तांबे यांना निलंबित करणार असल्याची माहिती आहे. त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांचे निलंबन यापूर्वीच करण्यात आले आहे. तांबे कुटुंबीयांचा कॉंग्रेसशी जवळपास काडीमोड झालेला असला तरी भाजपने त्यांना अद्याप पाठिंबा घोषित केलेला नाही आणि सत्यजीत तांबे यांनी पाठिंबा मागितलेलाही नाही. दुसरीकडे, काहीही होवो, नाशिकच्या निवडणुकीत सत्यजीत तांबेच निवडून येतील, असे सांगितले जात आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्यावरही माघार घेण्यासाठी दबाव असल्याचे सांगण्यात आले होते. पण त्या सकाळपासून नॉट रिचेबल होत्या.

अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी माघार न घेतल्यामुळे तेथे सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यातच लढत होणार असल्याचं दिसतंय. काँग्रेस विश्वासघातकी आहे आणि मी उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे की, काँग्रेसवर विश्वास ठेवू नका. तर पृथ्वीराज चव्हाण खोटारडे आहेत असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. याबाबत विचारले असता, प्रकाश आंबेडकर प्रक्रियेत नाहीत. मी त्यांच्यावर बोलणार नाही. असे नाना पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT