NCP and BJP
NCP and BJP Sarkarnama
विदर्भ

Teacher Graduate Election : 'बारामती जिंकण्याचे स्वप्न बघणारे स्वतःच्या बालेकिल्ल्यात पराभूत' !

सरकारनामा ब्यूरो

BJP and NCP News : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात कोकण वगळता भाजपला कुठेही यश मिळवता आले नाही. त्यावरून महाविकास आघाडीतील एकही पक्ष भाजपवर टिका करण्याची संधी सोडत नाहीये. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनीही आता भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

पराभव झाला तर दिलदारपणे स्वीकारायला हवा, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी भाजपला टोला लगावला होता. बारामती जिंकण्याचे स्वप्न बघणारे स्वतःच्याच बालेकिल्ल्यात पराभूत झाले, असे म्हणत कुंटे पाटील यांनी भाजप नेत्यांना डिवचले आहे.

या प्रकारामुळे भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमधील वाद चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रवीण कुंटे पाटील यांनी ट्विट करीत भाजप नेत्यांना डिवचले आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘विदर्भात पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजप चा सुफडा साफ झाला आहे. अडबाले नंतर आज लिंगाडे पण विजयी घोषित! बारामती जिंकण्याचे स्वप्न बघणारे स्वतःच्या बालेकिल्ल्यातच पराभूत !’

नागपूर आणि अमरावतीमध्ये पराभव होऊच नये, म्हणून भाजपने सर्वतोपरी प्रयत्न केले. अमरावतीमध्ये उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेळावा घेतला. जेणेकरून विजयाच्या मध्ये कुठलीही अडचण येऊ नये. पण तरीही दोन्ही ठिकाणी मतदारांना भाजपला हिसका दाखवलाच. यासाठी भाजपमधील गटबाजी जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे.

या निवडणुकीत जुनी पेन्शनच्या मुद्द्याने भाजपला पराभवाचे तोंड बघायला लावले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले होते की, जुनी पेन्शन देणे शक्यच नाही. तेव्हापासून २००५च्या नंतर शासकीय सेवेत रुजू झालेले सर्व कर्मचारी, शिक्षक राज्य सरकारच्या विरोधात गेले होते. ‘नो पेंशन - नो वोट’ अशी मोहिमही चालवण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांनी जुनी पेंशनचा मुद्दा गांभीर्याने घेतला होता आणि मतपेटीतून ते दाखवूनसुद्धा दिले.

या निकालांचे परिणाम आगामी निवडणुकांवर होणार असल्याचेही महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते सांगत आहेत. हा आमच्या ऐक्याचा विजय असून यापुढील प्रत्येक निवडणुकीत ही एकी कायम राहणार असल्याचे माजी मंत्री आमदार सुनील केदार, (Sunil Kedar) आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. परिणामी प्रवक्ते भाजपला (BJP) डिवचण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.

<iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?height=314&href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FSarkarnamaNews%2Fvideos%2F409602478037479%2F&show_text=false&width=560&t=0" width="560" height="314" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowfullscreen="true" allow="autoplay; clipboard-write; encrypted-media; picture-in-picture; web-share" allowFullScreen="true"></iframe>

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT