Maratha Reservation. Sarkarnama
विदर्भ

Maratha Reservation : आता शिक्षकांनीही शोधाव्या लागणार कुणबी नोंदी!

Education Department : ऐन परीक्षेच्या काळात आदेश आल्याने संघटनांचा विरोध

जयेश विनायकराव गावंडे

Akola : मराठा आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनाचा लढा सुरू केल्यानंतर हा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे, यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. आता या पार्श्वभूमीवर सरकारकडून मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर होत आहे. या नोंदी शोधण्यासाठी अकोला येथील शिक्षकांनीही हे काम देण्यात आले आहे. शिक्षक संघटनांनी याला विरोध केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, असे संघटनांनी नमूद केले आहे.

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात आता पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आमरण उपोषणानंतर जरांगे पाटील यांनी आता मागे हटायचे नाही, असे म्हणत ‘चलो मुंबई’चा नारा देत हजारो मराठाबांधवांनी मुंबईकडे कूच केली आहे. काहीही होवो मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका जरांगे-पाटील यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

आता या कामाला अधिक गती येण्यासाठी शिक्षकांना नियुक्त केले जाणार आहे. राज्यातील शाळांमध्ये सहामाही परीक्षा संपल्या आहेत. दिवाळीच्या सुट्याही आटोपल्या आहेत. आता अंतिम परीक्षेचे वेध लागले असताना आता 1967 पूर्वीच्या मराठा-कुणबी, कुणबी-मराठा विद्यार्थ्यांचे दाखले, नोंदी शोधण्याचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांना आता शाळेतील जुनी कागदपत्रे, नोंदी काढून शोध घ्यावा लागणार आहे.

वेळेत काम पूर्ण न झाल्यास शाळा बंद ठेवून काम करावे लागण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. अकोला महापालिका क्षेत्रातील 1 हजार 600 कर्मचारी मराठा आरक्षण देण्यासाठी महत्त्वपूर्ण नोंदींसंदर्भात 23 जानेवारी ते 31 जानेवारीदरम्यान अॅपच्या माध्यमातून विविध शाळांमधील शिक्षक, अधिकारी कर्मचारी सर्वेक्षण करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंदोलनाची भूमिका पाहता मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण होणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठी सात दिवसांत सर्वेक्षणासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महापालिका क्षेत्रात 1 हजार 600 कर्मचारी काम करणार आहेत. यासाठी काही शाळांमधील पूर्ण शिक्षकांना सर्वेक्षणासंदर्भात आदेश मिळाल्यामुळे काही शाळाच आठ ते दहा दिवस बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होईल, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

मराठा आरक्षण सर्वेक्षणात एका शाळेतील सर्व शिक्षकांना घेऊन शाळा बंद पडू देऊ नये, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. आमदार किरण सरनाईक यांची जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेचे मनीष गावंडे यांनीही आमदार किरण सरनाईक यांच्याशी याबाबत चर्चा केली.

अकोला शहरातील काही शाळेतील सर्व शिक्षकांना मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी नियुक्त केले आहे. हे सर्वेक्षण हे पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये पूर्ण करायचे असल्याने व काही शाळेतील सर्व शिक्षकांना सर्वेक्षण करण्याबाबत आदेश आल्याने पुढील आठ ते दहा दिवस शाळा बंद ठेवाव्या लागणार आहेत. यावर तोडगा म्हणून आमदार किरण सरनाईक यांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना निर्देश दिले असले तरी पुढे प्रशासन काय निर्णय घेते, हे पाहावे लागणार आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT