NCP and BJP Sarkarnama
विदर्भ

Cricketnama 2023 : राष्ट्रवादीच्या करेक्ट टायमिंगमुळं 'Team BJP' पराभूत!

प्रसन्न जकाते

BJP Kings Vs NCP (SP) Legends : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) : अत्यंत चूरशीच्या झालेल्या सामन्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट नागपूर शहर संघाने 'Team BJP'चा धुव्वा उडवत विजय मिळविला. नाणेफेक जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार(Sharad Pawar) गटाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भाजपच्या फटकेबाजीमुळं हीच टीम जिंकेल असं वाटत होतं. राष्ट्रवादी काँग्रेची सुरुवातही विकेट पडून झाली. पण जसजसा सामना पुढं सरकला तसतसे राष्ट्रवादी टीमचे खेळाडू भाजपवर भारी पडले.

मेकोसाबाग परिसरात असलेल्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी, मेथोडीस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड, श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंड परिसरात ‘क्रिकेटनामा’चे सोमवारी (ता. 11) थाटात उद्घाटन झाले.

राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) स्वागताध्यक्ष व माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके निमंत्रक असलेल्या या स्पर्धेचा पहिला सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नागपूर लेजंड्स आणि Team BJP यांच्यात सामन्याला प्रारंभ झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सामन्याला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच चेंडूत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने पहिल्याच चेंडूत भाजपची पहिली विकेट टिपली. त्यानंतर दुसऱ्या षटकात दुसरी विकेटही भाजपनं गमावली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वल नागपुरे आणि रोहित निकंबे यांनी एका पाठोपाठ बळी घेतल्यानं सचिन शेट्टी (धावा 0) आणि संतोष दानवे (धावा 0) यांना तंबूत परतावे लागले. परंतु राहुल कुल (धावा 25) आणि राम सातपुते (धावा 16) यांनी त्यानंतर तुफान फटकेबाजी केली.

याानंतर मात्र भाजपच्या टीमच्या विकेट पडत गेल्या सुनील राणे, मंगेश चव्हाण, जयकुमार गोरे यांना शून्य धावांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोलंदाजांनी पॅव्हेलियचा रस्ता दाखवला. आमदार समीर मेघे यांनी एक धाव काढली. पाच षटकं संपेपर्यंत भाजपची धाव संख्या 44 होती.

राष्ट्रवादीच्या गोलंदाजांपैकी उज्ज्वल नागपुरे यांनी 24 धावा देत एक विकेट घेतली. रोहित निकंबे यांनी 14 धावा दिल्या, तर एम. अन्सारी यांनी 2 धावा दिल्या. तर भाजपनं ठेवलेल्या धावांचं लक्ष्य गाठताना शरद पवार गटाची सुरुवातीला थोडी दमछाक झाली. सुरुवातीलाच एक विकेट पडली. अलोक तिवारी शून्य धावावर तंबूत परतले.

यानंतर राहुल कदम (9 धावा) आणि उज्ज्वल नागपुरे (31धावा) यांनी सामना सावरला. नागपुरे यांनी भाजपच्या चेंडूंवर चौकार, षटकार फटकावले. त्यानंतर धाव काढताना भाजपच्या खेळाडूंनी रनआऊटची अपीलही केली. परंतु तिसऱ्या पंचांनी रिव्ह्यू पाहिल्यानंतर त्यांना नॉट आऊट घोषित केले. त्यानंतर काही वेळातच एम. अन्सारी (3 धावा) हे झेलबाद झालेत. पुढे मैदानावर आलेल्या रोहित निकंबे यांनी जोरदार विजयी षटकार लगावला व विजय राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या खात्यात आला.

भाजपचे गोलंदाज जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे अलोक तिवारी, राहुल कदम यांना बाद केले. राम सातपुते, प्रशांत ठाकरे यांनी तुलनेने कमी धावा दिल्या, राहुल कुल(Rahul Kool) यांनी एम. अन्सारी यांची विकेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खेळाडू उज्ज्वल नागपुरे हे सामनावीर ठरले. सकाळचे (मुंबई) संपादक राहुल गडपाले, ‘सरकारनामा’चे ज्ञानेश सावंत यांच्या हस्ते त्यांना सामनावीरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. नीलेश नातू यांनी सामन्याचं सूत्रसंचालन व समालोचन केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT