Ahmednagar News : राजकारणात खालच्या पातळीवर सर्रास वापरली जाणारी भाषा, एकमेकांवर सुरू असलेली चप्पलफेक, वैयक्तिक पातळीवर होणारे आरोप, राजकीय विरोधकांशी वैयक्तिक दुश्मनी आणि वैर भावनेने पाहण्याचीवृत्ती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सकाळ डिजिटल मीडिया ग्रुपच्या सरकारनामाने आयोजित केलेल्या क्रिकेटनामा स्पर्धेचे खासदार सुजय विखे यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. तसेच मागील क्रिकेटनामा स्पर्धेच्या आठवणी जागृत करत आपल्याला या स्पर्धेत पुन्हा खेळायला आवडेल असे त्यांनी सांगितले.
विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशना दरम्यान सोमवार आणि मंगळवारी सरकारनामाच्या वतीने क्रिकेटनामा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सत्ताधारी, विरोधक अशा विविध गटा-तटाचे संघ एकमेकांसमोर भिडणार आहेत. नागपूरच्या ऐन हिवाळी गुलाबी थंडीत विधान मंडळात एकमेकांवर शाब्दिक फेक करून घायाळ करणारे सत्ताधारी आणि विरोधक आता पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील क्रीडा नगरीत तुफानी बॉलिंग फेक करत प्रतिस्पर्ध्याला बाद करण्यास आसुसले दिसतील. तर कधी विरोधकांच्या बॉलिंगचा चौकार-षटकार मारून धुव्वा उडवण्याचा तयारीत असतील.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नागपुरात पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी, श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंड, मेकोसाबागच्या मैदानावर सोमवार सायंकाळ पासून क्रिकेटनामाचा थरार सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर सुजय विखे यांनी सरकारनामाचे विशेष आभार मानले. जे काम फारसे कोणी करू शकले नाही ते काम सरकारनामाने करत क्रिकेटच्या मंचावर सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना एकत्र आणले आहे. मागील स्पर्धेत खेळल्याची आठवण सांगत विखे यांनी उद्या (मंगळवारी )आपण नागपूरला गेल्यास क्रिकेटनामा स्पर्धेस अवश्य भेट देऊ असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.