Maharashtra Government
Maharashtra Government Sarkarnama
विदर्भ

समृद्धी महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीला तहसीलदारांचा जबर दणका...

गजानन काळुसे

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी 38 हजार 994.216 ब्रास विना परवानगी गौण खनिजाचे अवैध उत्खनन करणाऱ्या रोडवेज सोल्यूशन कंपनीला तहसीलदार (Tahasildar) सुनील सावंत यांनी 21 कोटी 64 लाख 17 हजार 899 रुपयांचा दंड केला आहे.

बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील सिंदखेड राजा (Sindakhed Raja) तालुक्यातून समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) गेला आहे. तालुक्यातील ग्राम विझोरा येथील शिवारातून समृद्धी महामार्ग जातो. समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मुरुमाचा वापर करण्यात आला होता. त्यासाठी रोडवेज सोल्यूशन कंपनीकडून अवैध मुरुमांचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करण्यात आले होते. ग्राम विझोरा शिवाराच्या गट क्रमांक 238, 239, 442, 395, 394, 341 या ठिकाणांवरून परवानगी नसताना अवैध मुरूम मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करण्यात आले होते. ग्राम विझोरा शिवारामध्ये शासनाकडून (Maharashtra Government) समृद्धी महामार्गासाठी गौण खनिजांची परवानगी देण्यात आली होती.

परंतु संबंधित कंपनीने शासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा वेगळ्या ठिकाणचे अवैध गौण खनिजाचे उत्खनन मोठ्या प्रमाणामध्ये गेले आहे. यामध्ये ग्राम विझोरा येथील मोठमोठ्या माळांना खोदून मुरुमांचे अवैध उत्खनन करण्यात आले होते. याच ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेली वनसंपदा अवैध गौण खनिजांचे उत्खनन केल्यामुळे नष्ट झाली आहे. महसूल प्रशासनाकडून तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला होता. त्यानंतर उपअधीक्षक भूमी अभिलेख सिंदखेडराजा व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना तांत्रिक मोजणी करण्यास सांगितले होते.

त्यासाठी संबंधित विभागाने मोजमाप करताना व्यवस्थापक रोडवे सोल्यूशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड कॅम्प तढेगांव तालुका सिंदखेड राजा यांना कळविले होते, परंतु संबंधित कंपनीकडून कोणीही अधिकारी व कर्मचारी मोजमाप करतेवेळेस उपस्थित नव्हते. संबंधित विभागाने अवैध उत्खनन केलेल्या गौण खनिजांचे मोजमाप करण्यात आले. त्यानंतर वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात आला. त्यामध्ये ग्राम विझोरा शिवारातील गट क्रमांक 238, 239, 442, 395, 394 व 341 या ठिकाणांचा खनिज पट्टा नसतानासुद्धा रोडवे सोल्यूशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड कॅम्प तढेगाव या कंपनीने 38 हजार 994.216 ब्रास विनापरवानगी गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक केल्याचे नमूद करण्यात आले. त्यानुसार तहसीलदार तथा दंडाधिकारी सुनील सावंत यांनी सदर कंपनीला दंड ठोठावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT