Navneet Rana Latest News in Marathi, Uddhav Thackeray News
Navneet Rana Latest News in Marathi, Uddhav Thackeray News sarkarnama
विदर्भ

Navneet Rana News : राणांनी दिल्या ठाकरेंना संक्रातीच्या शुभेच्छा ; म्हणाल्या, "आत्ता तरी तिखट बोलणं.."

सरकारनामा ब्युरो

Navneet Rana News : हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Navneet Rana) लक्ष्य करणाऱ्या नवनीत राणा (Uddhav Thackeray) यांनी पु्न्हा एकदा हल्लाबोल केला आहे. अमरावतीच्या खासदार, भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी ठाकरे गटातील नेत्यांना संक्रातीनिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर नवनीत राणा यांनी निशाणा साधला आहे. एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर खोचक टीका केली.

नवनीत राणा म्हणाल्या, "उद्दव ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे या तिघांसाठी मी स्पेशली तिळगूळ पाठवते. आत्ता तरी खोटं बोलणं सोडा, तिखट बोलणं सोडा. माझ्याकडून आणि महाराष्ट्राच्या जनतेकडून मी तुम्हाला तिळगूळ देते आणि गोड गोड बोलायची सुरुवात करा अशा शुभेच्छा तुम्हाला देते,"

"महाराष्ट्रातील जनतेला मी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतेय. तसेच, काही अशी नावे आहेत, ज्यांना मी विशेष तिळगूळ पाठवणार आहे. कारण जेव्हाही ते बोलतात तेव्हा खोटं बोलतात, कडू बोलतात आणि तिखट बोलतात," असा टोला त्यांनी लगावला.

“फेसबुक लाइव्हवर उद्धव ठाकरे यांच्या काळात सरकार अडीच वर्ष चालले. हनुमान चालीसा वाचली म्हणून एका लोकप्रतिनिधीला १३ दिवस या उद्धव ठाकरेंनी तुरुंगात टाकले. बाळासाहेबांचे विचारचं त्यांनी घरात ठेवले नाहीत मग यांचं काय होईल?'असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT