Shiv Sena News : उद्धव ठाकरेंना धक्का : SRA घोटाळ्याप्रकरणी मोठ्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल

Kishori Pednekar News : गोमाता जनता एसआरए वरळी मुंबई येथे फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.
Kishori Pedanekar
Kishori Pedanekarsarkarnama

Kishori Pednekar: मुंबईच्या माजी महापौर, शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याविरोधात वरळी येथील गोमाता एसआरए (Worli Gomata SRA) प्रकरणी वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात (Nirmal Nagar Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

एसआरए घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी टि्वट ही माहिती दिली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या किशोरी पेडणेकरांसह चौघाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kishori Pedanekar
Satyajit Tambe News : सत्यजीत तांबेंच्या अडचणी वाढल्या ;..सेनेचा विरोध

"बहुचर्चित एसआरए घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकर कुटुंब आणि किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध गोमाता जनता एसआरए वरळी मुंबई येथे फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे," अशी माहिती सोमय्यांनी टि्वट करुन दिली आहे.

Kishori Pedanekar
RSS ने जागवल्या चाळीस वर्षांपूर्वींच्या त्या आठवणी...

वरळी येथील गोमाता इमारत ही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बांधण्यात आली आहे. किशोरी पेडणेकर यांनी बेकायदेशीरपणे या इमारतीमधील सदनिका बळकावल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता.

किरीट सोमय्या म्हणाले, "कोरोना क्वारंटाईन सेंटर घोटाळ्यात मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना ईडीने नोटीस बजावली. शिवसेनेच्या नेत्यांचे गैरव्यवहार आता एकामागोमाग एक समोर येत आहेत. आता एसआरए घोटाळ्यात किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढणार असून त्यांची लवकरच चौकशीही होईल”

एफआयआरमध्ये किशोरी पेडणेकर यांच्यासह शैला प्रशांत गवस, प्रशांत गवस, गिरीश रेवणकर, साईप्रसाद पेडणेकर आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय दंडविधान संहिता (IPC) 419, 420,465,468, 471 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Kishori Pedanekar
Nitin Gadkari News : धक्कादायक : नितीन गडकरींना दाऊदच्या नावाने जीवे मारण्याची धमकी

किरीट सोमय्या म्हणाले, "कोरोना क्वारंटाईन सेंटर घोटाळ्यात मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना ईडीने नोटीस बजावली. शिवसेनेच्या नेत्यांचे गैरव्यवहार आता एकामागोमाग एक समोर येत आहेत. आता एसआरए घोटाळ्यात किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढणार असून त्यांची लवकरच चौकशीही होईल”

एफआयआरमध्ये किशोरी पेडणेकर यांच्यासह शैला प्रशांत गवस, प्रशांत गवस, गिरीश रेवणकर, साईप्रसाद पेडणेकर आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय दंडविधान संहिता (IPC) 419, 420,465,468, 471 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com