Nitin Gadkari Statement
Nitin Gadkari Statement  Sarkarnama
विदर्भ

Nitin Gadkari Statement : ''राहुल गांधी यांचे आभार मानतो;कारण...''; मंत्री गडकरींचं सावरकर वादावर मोठं विधान

सरकारनामा ब्यूरो

Nagpur News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप गांधी यांच्या विधानावर चांगलाच आक्रमक झाला असून देशभरात ठिकठिकाणी गांधी यांचा आंदोलनं,मोर्चे यांद्वारे निषेध नोंदविला जात आहे. तसेच राज्यातही शिंदे फडणवीस सरकारकडून सावरकर गौरव यात्रेद्वारे गांधी यांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

आता याचदरम्यान,भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं उद्भवलेल्या सावरकर वादावर मोठं विधान केलं आहे.

मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी नागपूर येथील भाजपच्या वतीने आयोजित 'सावरकर गौरव यात्रे'त वीर सावरकर यांच्याविषयी गौरवौद्गार काढले. यावेळी त्यांनी सावरकर वादावरुन काँग्रेस आणि राहुल गांधी यांना उपरोधिक टोला लगावला. या कार्यक्रमाला खासदार सुधांशु त्रिवेदी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार अजय संचेती, खासदार कृपाल तुमाने,राजे मुधोजी भोसले इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.  

गडकरी म्हणाले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, सावरकर हे आमचे दैवत आहे. पण राहुल गांधी यांनी गैरसमज करून सावरकर यांनी माफी मागितली असं म्हटलं. आता त्यांनी मोठेपणा दाखवत माफी मागितली पाहिजे. न्याय मागण्यासाठी त्यांना न्यायालय आहे. त्यात सावरकर यांना मध्ये आणण्याची गरज नव्हती. शिवाजी महाराजांनी जे सांगितलं तेच तर सावरकरांनी सांगितलं असंही गडकरी म्हणाले.

यावेळी लाल दिव्याची गाडी मिळावी म्हणून आम्ही राजकारणात आलो नाही, आमचा विचार मांडण्यासाठी राजकारणात आलो अशा स्पष्ट शब्दांत गडकरी यांनी विरोधकांना ठणकावलं.तसेच मरता क्या नही करता व अंधेरी रात में दिया तेरे हात में अशी अवस्था राहुल गांधी असा टोलाही गडकरी यांनी लगावला आहे.

..म्हणून राहुल गांधी यांची मी आभार मानतो?

राहुल गांधी यांच्यासारख्या कितीही लोकांनी सावरकरांचा कितीही अपमान केला तरी त्यांची महानता कमी होत नाही. पण त्यांचे मी आभार मानतो, जर त्यांनी सावरकरांचा अपमान केला नसता तर आम्ही घराघरात पुन्हा ते पोहचविले नसते. आम्ही या चौकात एकत्र आलो नसतो, तरुणांमध्ये सावरकर सांगता आले नसते. त्यामुळं राहुल गांधी यांनी संधी मिळवून दिली आहे. आता वीर सावरकर हे तरुण पिढीच्या मनामनात, घराघरात पोहचवा असं आवाहनही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना केलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT