Donald Trump Arrest : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पॉर्न स्टारशी संबंधित एका फौजदारी खटल्यात मंगळवारी मॅनहॅटन न्यायालयात हजर झाले. ट्रम्प न्यायालयात पोहोचताच पोलिसांनी त्यांना अटक केली.
डोनाल्ड ट्रम्प हे गुन्हेगारी आरोपांना सामोरे जाणारे अमेरिकेच्या (America politics) इतिहासातील पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. ट्रम्प यांच्यावर 2016 च्या अध्यक्षीय प्रचारादरम्यान अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सला (Stormy Daniels Trump) तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप आहे. (America Conservatives Party)
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येणार असल्याने न्यायालयाच्या खोलीत आणि बाहेर विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. कोर्टात हजर राहण्याच्या काही अवधी आधी, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या समर्थकांना एक ईमेल पाठवला, ज्यामध्ये त्यांनी दावा केला होता की, हा अटकेपूर्वीचा शेवटचा ईमेल आहे. यात त्यांनी अमेरिका हा ‘मार्क्सवादी थर्ड वर्ल्ड’चा देश बनत असल्याचे म्हटले आहे.
'आज आम्ही अमेरिकेत न्याय गमावल्याबद्दल शोक व्यक्त करतो. आजचा दिवस असा आहे की, जेव्हा सत्ताधारी राजकीय पक्ष कोणताही गुन्हा न केल्याबद्दल त्याच्या मुख्य प्रतिस्पर्ध्याला अटक करतो, असेही ते म्हणाले.
कोर्टात जाण्यापूर्वी ट्रम्प यांनी केला ईमेल, काय म्हणाले?
माजी राष्ट्राध्यक्षांनी आपल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, 'आमची ही मोहीम खूप पुढे गेली आहे. आणि माझ्या मनात शंका नाही की, आपण पुन्हा जिंकू आणि 2024 मध्ये व्हाईट हाऊसमध्ये परत येऊ. तुमच्या समर्थनाबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो. आम्हाला मिळालेल्या सर्व देणग्या, पाठिंबा आणि प्रार्थना पाहून मी भारावून गेलो आहे. माझ्यासाठी नाही - तर आपल्या देशासाठी जे घडत आहे ते पाहून वाईट वाटते.'
डोनाल्ड ट्रम्प सोमवारी त्यांच्या 'मार-ए-लागो' निवासस्थानातून बोईंग 757 विमानातून न्यूयॉर्कला रवाना झाले. न्यू यॉर्कच्या ला गार्डिया विमानतळावर ईस्टर्न स्टँडर्ड टाइम (EST) वेळेनुसार दुपारी 3:00 वाजता (12:30 IST) आगमन झाले. त्यांचा ताफा मॅनहॅटनमधील 'फिफ्थ अॅव्हेन्यू'वर असलेल्या 'ट्रम्प टॉवर'कडे निघाला, जिथे ट्रम्प रात्रीचा मुक्काम करणार होते. टॉवरच्या आजूबाजूच्या रस्त्यांची नाकाबंदी करण्यात आली असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माजी राष्ट्रपती त्यांच्या कारमधून बाहेर पडले तेव्हा, त्यांनी त्यांच्या समर्थकांना अभिवादन केले आणि सुरक्षा कर्मचार्यांनी त्यांना तातडीने इमारतीच्या आत नेले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.