Pratibha Dhanorkar MLA, Warora. Sarkarnama
विदर्भ

...अन् ते २२ परिवार म्हणाले; ताई, तुम्ही देवासारख्या आल्या बघा!

सरकारनामा ब्यूरो

चंद्रपूर : दिवाळीचा सण तोंडावर आला. घरात काही नाही. आईवडील आणि मुलाबाळांना कपडे, पत्नीला साडी कशी घ्यावी, या विवंचनेत असताना अचानक घरी कुणी आले अन् दिवाळी साजरी करण्याची सोय करून दिली तर... तर, त्याचा आनंद गगनात मावेनासा होईल. वरोरा तालुक्यातील २२ कुटुंबांना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ही सुखद भेट दिली आहे.

राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून वरोरा तालुक्यातील २२ परिवारांना आर्थिक साहाय्य आमदार धानोरकर यांनी मिळवून दिले. हे अर्थसाहाय्य त्यांनी गरजूंच्या घरी स्वतः जाऊन दिले. प्रत्येकी वीस हजार रुपयांचा चेक व दिवाळीची भेट म्हणून साडी वितरित करण्यात आले. यावेळी त्यानिमित्ताने आमदारांनी परिवारातील कुटुंबाची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ऐन दिवाळीच्या दिवशी आमदार घरी आल्या अन् दिवाळी साजरी करण्याची व्यवस्था केली. त्यामुळे ‘ताई, तुम्ही देवासारख्या धाऊन आल्या बघा’, अशा प्रतिक्रिया गरीब परिवारातील लोकांनी दिल्या.

मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना पोचविण्याकरिता आमदार प्रतिभाताई धानोरकर ह्या नेहमी आग्रही असतात. अनेक महिन्यांपासून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांचे कुटुंबीय मदतीपासून वंचित होते. त्यांना मदत मिळवून त्यांना आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत मंगला कश्यप, वैशाली पुंजनवार, सोनी बंडू परसे, बेबी गजानन बोढे, लता भाऊराव कोंडवार, लक्ष्मी बावणे, दुर्गा ज्ञानेश्वर वाटकर, स्वाती सोनुने, प्रेमीला सिडाम, सपना चौधरी, इंदिरा निखाडे, अर्चना जवादे, सिन्धू तुराणकर, सीमा खातरकर, राधा उईके, शीला नन्नावरे, मंदा डांगे, कुंदा साखरकर, सविता दुधलकर, निता कन्नाके, मनीषा गणेश लोडे, निरुपा डोंगरे होत्या.

लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांना आमदार धानोरकर, वरोऱ्याचे तहसीलदार संतोष मकवाने, नायब तहसीलदार काळे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राजेंद्र चिकटे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष मिलिंद भोयर, काँग्रेस कमिटी शहर विलास टिपले, नगरसेवक राजू महाजन, पटवारी विनोद खोब्रागडे , रवींद्र धोपटे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. मतदार संघातील पीडित शासकीय योजनांपासून वंचित राहता कामा नये, कोणत्याही पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांना ठरावीक कालावधीतच लाभ दिला जावा, अशा सूचना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT