MLA Sanjay Raymulkar Sarkarnama
विदर्भ

Sanjay Raymulkar viral Audio : 'ती' ऑडियो क्लिप खोडसाळपणाची :रायमुलकरांनी सांगितलं सत्य

Buldhana News: मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांचा ग्रामपंचायत सदस्याला शिवीगाळ केल्याचा ऑडिओ शनिवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाला.

सरकारनामा ब्यूरो

Mehkar News : बुलडाण्यातील मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांचा ग्रामपंचायत सदस्याला शिवीगाळ केल्याचा ऑडिओ शनिवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यावर ते काय उत्तर देणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, समाजमाध्यमावर व्हायरल झालेला हा ऑडिओ एकतर्फी आणि खोडसाळपणा असल्याचा दावा रायमुलकरांनी केला आहे.

व्हायरल ऑडिओ प्रकरणी रायमुलकरांनी पत्रकार परिषदेत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "एका व्यक्तीने मी शिवीगाळ केल्याची संभाषणाची क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल केली ती एकतर्फी व खोडसाळपणाची असल्याचा दावा रायमुलकरांनी केला आहे. तसेच, संंबंधित व्यक्तीने मला पाठविलेले अश्लील पत्रही मी मुख्यमंत्र्यांना दाखवले असून पोलिसांकडेही दिल्याचे आमदार संजय रायमूलकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याचवेळी त्यांनी त्या पत्राच्या प्रतीही पत्रकारांना वाचायला दिल्या.

संबंधित व्यक्तीने मला घरच्या पत्त्यावर पाच महिन्यांपूर्वी पोस्टाने पाठविलेले अतिशय घाणेरड्या भाषेतील, अश्लील व एकेरी उल्लेख करणारे पत्र पाठवले होते. या प्रकाराने मी अनेक दिवस अस्वस्थ असून हे पत्र मी मुख्यमंत्र्यांना दाखविले तेव्हा त्यांनी तात्काळ तत्कालीन पोलीस अधीक्षक चावरीया यांना कॉल करून चर्चा केली. पत्राची प्रत पोलिसांना दिल्याची माहिती रायमुलकरांनी यावेळ दिली आहे.

रायमुलकर म्हणाले, ४ ऑगस्टला संबंधित व्यक्तीने मला कॉल करून असभ्य भाषेत संभाषण करत गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. लेटरबॉम्ब कसा वाटला म्हणून विचारणा केली. त्याचवेळेस मला आलेले गलिच्छ भाषेतील पत्रही याच व्यक्तीने पाठविल्याची माझी खात्री झाली. मलाही स्वाभिमान, इज्जत आहे. म्हणून मी संतापाच्या भरात त्या व्यक्तीला शिवीगाळ केली. समोरच्या व्यक्तीने आधी मला केलेली शिवीगाळ इत्यादी क्लिपमध्ये न घेता नंतरचे संभाषण रेकॉर्ड करून व्हायरल केले. माझी बदनामी करणे हा त्यामागे उद्देश होता. (Buldhana News)

माझ्या घरातील सदस्यांबद्दल ,राज्यातील महिला आमदारांबद्दल गलिच्छ भाषेत मला पाठविलेले पत्र, नंतर त्या व्यक्तीकडून पत्र कसे वाटले म्हणून मोबाईलवर विचारणा, मोबाईलवर एकेरी उल्लेख करत मला केलेली शिवीगाळ आणि नंतर मी सहन न होऊन केलेली शिवीगाळ व त्याने आधीचे संभाषण रेकॉर्ड न करता केवळ मी केलेली शिवीगाळ व्हायरल केली. या प्रकारातून ती व्यक्ती विकृत मनोवृत्तीची असल्याचे दिसून येते. यात स्वतः मुख्यमंत्री लक्ष घालत असून मीही आता पोलीस कारवाई करण्याची मागणी केला आहे. असंही रायमुलकरांनी यावेळी स्पष्ट केलं.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT