Mehkar (Buldhana) News: पाचोऱ्यातील आमदार किशोर पाटील यांची एका पत्रकाराला शिवीगाळ केल्याचे प्रकरण समोर आले होते. हे प्रकरण शांत होत नाही तोच मेहकर येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय रायमूलकर यांनी ग्रामपंचायत सदस्याला शिवीगाळ केल्या क्लीप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांना नेमकं झालयं तरी काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांचे अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्याचे अनेक व्हि़डीओ माध्यमांसमोर आले. आमदार संतोष बांगर यांचा व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. यावरून मोठं राजकारणही रंगले, त्यात आता बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रायमुलकरांची भर पडली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे ‘शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मेहकर तालुक्यातील साब्रा येथील गजानन वानखेडे या ग्रामपंचायत सदस्याने डॉ.संजय रायमुलकर यांना कार्यक्रमाच्या पास मागण्यासाठी फोन केला होता.मात्र वारंवार फोन केल्याने आमदार रायमुलकर चिडले आणि त्यांनी थेट या ग्रामपंचायत सदस्याला अश्लील शिवीगाळच केली. त्यांच्या कॉल रेकॉर्ड सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत एकच खळबळ उडाली आहे.
यात कार्यक्रमाचा पास मागण्यावरून आमदार रायमूलकर हे शिवीगाळ करीत मारहाणीची धमकी देत असल्याचा संवाद आहे. रायमूलकर हे सद्या मुंबईत आहेत.त्यामुळे ते मेहकर येथे आल्यानंतर काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष असणार आहे. पण शिवीगाळ करण्याची रायमुलकरांची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी त्यांनी काही लोकांना शिवीगाळ केल्याचे ऑडिओ व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.आमदार रायमूलकरांचा शिंदे गटाच्या १६ आमदार अपात्र सुनावणीत सहावा क्रमांक असल्याचे सागंण्यात येत आहे.
गेल्या चार पाच दिवसापूर्वी शिंदे गटाचे पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनीदेखील एका पत्रकाराला सुद्धा शिवीगाळ केली होती.त्यावरून बराच वाद पेटला आहे, तो अद्याप शांतही झालेला नसताना शिंदे गटाच्याच रायमूलकरांनी ग्रामपंचायात सदस्याला शिवीगाळ केल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या आमदारांना नेमकं झालयं तरी काय?असा प्रश्न जनतेला पडला आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.