Deepak Karande Sarkarnama
विदर्भ

बरमुड्यावर आलेल्या ‘त्या’ अधिकाऱ्यांने दिली वाळू माफियांना हुलकावणी...

शासकीय वाहन नसल्याने तस्करांना जराही शंका आली नाही. तेवढ्यात टी शर्ट आणि बरमुड्यावर असलेले तहसीलदार करांडे Deepak Karande टेम्पोतून खाली उतरले.

Abhijeet Ghormare

भंडारा : जिल्ह्यात वाळू तस्करांचे (Sand smugglers) नेटवर्क जबरदस्त स्ट्रॉंग आहे. तपास पथकाला चकवित ते आपले काम बिनबोभाटपणे चालवतात. अशा परिस्थितीत तस्करांचे नेटवर्क तोडत, त्यांना हुलकावणी देत मोहाडीचे तहसीलदार दीपक करांडे (Deepak Karande) यांनी वाळू माफियांचे पाच टिप्पर पकडले आणि ८० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

तस्करांना संशय येऊ नये म्हणून आज पहाटे तहसीलदार करांडे साधा टी शर्ट आणि बरमुड्यावर रस्त्यावर उतरले. छोट्या टेम्पोने त्यांनी तस्करी सुरू असलेल्या परिसरात गस्त घालणे सुरू केले. मोहाडी तालुक्यातील रोहा-बेटाला घाटाजवळ त्यांना वाळू वाहून नेणारे टिप्पर आढळले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता टिप्पर थांबवले. शासकीय वाहन नसल्याने तस्करांना जराही शंका आली नाही. तेवढ्यात टी शर्ट आणि बरमुड्यावर असलेले तहसीलदार करांडे टेम्पोतून खाली उतरले.

एकदमच साध्या वेषात असलेल्या तहसीलदारांना टिप्परवाले ओळखू शकले नाही आणि त्यांच्यासोबत मुजोऱ्या करू लागले. त्यानंतर करांडे यांनी ओळख देताच सर्व जण ‘शॉक’ झाले. करांडे आणि त्यांच्या टिमने पाचही टिप्परवर कारवाई केली आणि दंड ठोठावला. या कारवाईने इतर तस्करांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई होताच आसपासच्या परिसरात असलेल्या लोकांनी काढता पाय घेतला. तहसीलदारांनी गुप्त माहितीच्या आधारे आजची कारवाई केली.

भंडारा जिल्ह्याच्या वाळूला पूर्व विदर्भात प्रचंड मागणी आहे. वाळू तस्करांची नजर नेहमी येथील वाळूवर असते आणि प्रशासनाला हुलकवण्या देत जोमात तस्करी केली जाते. अशीच वाळू तस्करी सुरु असल्याची गुप्त माहिती मोहाड़ी तहसीलदार दीपक करांडे यांना मिळाली. त्यांनी लागलीच एक टीम तयार करत स्वतः कारवाई करण्याचे ठरविले. मात्र, वाळू माफियांचे नेटवर्कही तितकेच तोडिचे असल्याने त्यांना हुलकावणी देण्याची योजना तयार केली. एका छोट्या टेम्पो गाडित स्वतः तहसीलदार करांडे बसले आणि घटनास्थळ गाठत वाळू तस्करी करणारे 5 टिप्पर ट्रक जप्त केले. पाचही टिप्पर मोहाडी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT