उमरखेड (जि. यवतमाळ) : येथील काही तरुणांनी एका समाजाबद्दलचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मिडियावर (Social Media) अपलोड केला. त्यामुळे एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या. याची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली. दरम्यान तोडफोड व जाळपोळ झाल्याने तणावसदृष वातावरण निर्माण झाले होते. आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (Shiv Sena) व भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले.
येथील काही समाजकंटक तरुणांनी दुचाकीवर बसून दुसऱ्या धर्माबद्दल काही मिनिटांचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओने दुसऱ्या समाजाची धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यांनी याची तक्रार उमरखेड पोलिस ठाण्यात केली. जमलेल्या तरुणांनी पोलिस प्रशासनाला दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर दुसऱ्या समाजाच्या भावना चांगल्याच दुखावल्या गेल्या. पुसद येथील आक्रोश मोर्चासाठी पोलिस गेल्यामुळे पोलिस स्टेशनसमोर जमाव वाढतच गेला. आरोपींवर कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिसांनी जमावाला सांगितले. तरीही जमाव शांत झाला नाही. जमावाने जाताना सदानंद वॉर्डातील प्रेरणा केश कर्तनालय या दुकानाची तोडफोड केली तर नाग चौकातील गणेश ऑटोमोबाईल्सची जाळपोळ करून रस्त्यातील गाड्यांचीही तोडफोड केली.
यानंतर आमदार नामदेव ससाणे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक संदीप ठाकरे, शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करीत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. मध्यरात्री जिल्हा पोलिस अधीक्षक टीमसह आले. त्यांनी सर्वांसोबत बैठक घेत नुकसान झालेल्यांना तक्रार दाखल करण्यास सांगितले.
आरोपींना लवकरच अटक केली जाईल. त्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असे सांगून नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. तोपर्यंत पोलिसांची कुमक शहरात येत होती. रात्री तणाव पूर्ण शांतता होती. घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेत पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. रात्रीच्या घटनेच्या निषेधार्थ शहरातील दुकाने बंद आहेत व तपास सुरू आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून, आरोपींच्या शोधार्थ पोलिसांच्या टीम रवाना झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.