Nagpur Sarkarnama
विदर्भ

Nagpur जिल्ह्यात भाजप नंबर १, दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेस, बावनकुळेंचा दावा खरा?

BJP : भारतीय जनता पक्ष समर्थीत उमेदवारांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले असून या निकालांमध्ये भारतीय जनता पक्ष समर्थीत उमेदवारांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे. भाजप पाठोपाठ कॉंग्रेस, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे.

नागपूर (nagpur) जिल्ह्यातील ५ ग्रामपंचायती अविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्यात २३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Election झाल्या. जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी कामठी तालुक्यात २७ ग्रामपंचायतींपैकी भाजप (BJP) समर्थीत उमेदवारांनी १६ तर कॉंग्रेस (Congress) समर्थीत उमेदवारांनी ११ जागांवर विजय मिळविला आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रवादी कॉंग्रेस, उद्धव ठाकरे सेना आणि एकनाथ शिंदे सेनेला खातेही उघडता आले नाही. उमरेड तालुक्यात भाजप ५, तर राष्ट्रवादीने दोन ग्रामपंचायती पटकावल्या. येथे इतर पक्षांना भोपळाही फोडता आला नाही.

हिंगणा तालुक्यातील एकूण ७ जागांपैकी भाजप ५ आणि राष्ट्रवादी २, काटोल तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींपैकी भाजप १३, राष्ट्रवादी ८, कॉंग्रेस ३, तर शेकाप आणि इतर लहान पक्षांनी ७ जागांवर विजय मिळविला. रामटेकमध्ये एकूण ८ पैकी भाजप १, कॉंग्रेस आणि शिंदे सेना ३, नरखेड तालुक्यात २२ ग्रामपंचायतींपैकी भाजप १०, कॉंग्रेस ६, राष्ट्रवादी २, नागपूर ग्रामीण मधील १९ पैकी भाजप १०, कॉंग्रेस ६, राष्ट्रवादी २, कुही तालुक्यात एकूण ४ पैकी भाजप १ आणि कॉंग्रेस ३ जागांवर विजयी झाली आहे.

भिवापूर तालुक्यातील १० ग्रामपंचायतींपैकी भाजप ५, कॉग्रेस ४ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस १, कळमेश्‍वरमध्ये एकूण २३ पैकी भाजप ४, कॉंग्रेस १७, उद्धव ठाकरे सेना १ तर अपक्षांनी १ ग्रामपंचायतीवर बाजी मारली आहे. माजी मंत्री आमदार सुनील केदार यांच्या सावनेर तालुक्यात एकूण ३६ ग्रामपंचायतींपैकी भाजप १६, कॉंग्रेस १४ आणि अपक्षांनी ६ जागांवर विजय मिळविला आहे. पारशिवणी तालुक्यात २१ पैकी भाजप ५, कॉंग्रेस १२, शिंदे सेना २, तर अपक्षांनी २ ग्रामपंचायती काबीज केल्या. मोदा तालुक्यात २५ पैकी भाजप ११, कॉंग्रेस ९, राष्ट्रवाद २, तर प्रहार पक्षाने १ ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी घोषित केल्याप्रमाणे नागपूर जिल्ह्यात तरी भाजपने निम्म्यापेक्षा जास्त जागा जिंकल्याचे दिसत आहे. पण ग्रामपंचायतीची निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढली जात नाही. निकालानंतर ग्रामपंचायतींवर दावे-प्रतिदावे केले जातात. त्यामुळे आगामी काळात हा आकडा स्पष्ट होत जाणार आहे. कुणाकडे किती ग्रामपंचायती आल्या, हे स्पष्ट होण्यासाठी काही काळ वाट बघावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT