Winter Session : नागपूर अधिवेशनात शिंदे-फडणवीसांचा मोठा डाव; तब्बल 'एवढी' विधेयकं आणणार

Maharashtra Winter Session : हे अधिवेशन वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन गाजण्याची शक्यता
 Eknath Shinde| Devendra Fadanvis
Eknath Shinde| Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Winter Session : सध्या महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. या अधिवेशनामध्ये वेगवेगळे विधेयकं पारित केले जाणार आहे. तसेच हिवाळी अधिवेशन हे वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन गाजण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात अनेक विधेयकं पारित केले जाणार आहेत. यावेळी कोणते विधेयकं पटलावर ठेवावण्यात येणार आहेत. याबाबत थोडक्यात माहिती पाहूयात...

या बरोबरच हिवाळी अधिवेशनामध्ये (Maharashtra Winter Session 2022) महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेलेले उद्योग, लोकायुक्त कायद्याचं विधेयक यासह अनेक मुद्दे या अधिवेशनामध्ये गाजणार आहेत. दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांपुढे शिंदे-फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे. (Winter Session Nagpur 2022)

 Eknath Shinde| Devendra Fadanvis
Shahaji Bapu Patil: अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या शहाजी बापूंसमोर 'ही' वेगळीच अडचण; म्हणाले...

हिवाळी अधिवेशनात कोणते विधेयके प्रस्तावित?

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (तिसरी सुधारणा) विधेयक २०२२ (ग्रामविकास विभाग), महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) सुधारणा विधेयक २०२२ (कृषी विभाग), सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक, मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) विधेयक २०२२ (नगर विकास विभाग), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) तसेच महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक २०२२ उच्च व तंत्र शिक्षण विभाग, जे.एस.पी.एम.युनिव्हसिर्टी विधेयक २०२२ उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र पोलीस व महाराष्ट्र सिनेमा विनियमन सुधारणा विधेयक २०२२, गृह विभाग.

 Eknath Shinde| Devendra Fadanvis
Ashok Chavan : बोम्मईंच्या ट्विट प्रकरणी सरकारने बोटचेपी, नरमाईची भूमिका का घेतली ?..

महाराष्ट्र औद्योगिक संबंध, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामे (नोकरीचे नियमन व कल्याण), महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) आणि महाराष्ट्र कागारांचा किमान घरभाडे भत्ता (सुधारणा) विधेयक २०२२ उद्योग ऊर्जा व कामगार, विधानपरिषद विधेयक- युनिवर्सल ए.आय.विद्यापीठ, पुणे विधेयक २०२२ उच्च व तंत्र शिक्षण विभाग), विधानपरिषद विधेयक - पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, पुणे विधेयक २०२२ उच्च व तंत्र शिक्षण विभाग), विधानसभा विधेयक- महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक २०२२ (सामान्य प्रशासन विभाग), विधानसभा विधेयक - उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधीन करणे (सुधारणा) विधेयक २०२२ (नगर विकास विभाग, विधानसभा विधेयक - महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक २०२२ (वित्त विभाग).

 Eknath Shinde| Devendra Fadanvis
Winter Session News : ठाकरेंच्या आमदाराला सभागृहातच फडणवीसांची मंत्रिपदाची ऑफर...

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (तिसरी सुधारणा) अध्यादेश २०२२ ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र आकस्मिकता निधी (सुधारणा) अध्यादेश २०२२ आकस्मिकता निधीमध्ये तात्पुरती वाढ करण्याबाबत- वित्त विभाग, महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) सुधारणा अध्यादेश, २०२२, शेतकऱ्यांना निवडणुकीत उभे राहता येण्याकरता नियमात सुधारणा करण्याबाबत-कृषी विभाग, मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२२, इमारतीच्या किंवा जमिनीच्या भांडवली मुल्यात सुधारणा करण्याबाबत-नगर विकास विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश २०२२- उच्च व तंत्र शिक्षण विभाग.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com