<div class="paragraphs"><p>Leislative Council Election</p></div>

Leislative Council Election

 

Sarkarnama

विदर्भ

अशा झाल्या गमती-जमती; पाच मते अवैध, दोघांची मतपत्रिका कोरीच...

निलेश डोये

नागपूर : विधान परिषदेची निवडणूक जिंकण्यासाठी एक-एक महत्त्वाचे असते. असे असतानाही दोन मतदारांनी मतपत्रिका कोरी टाकून सेफ गेम खेळला. त्यामुळे हे बहाद्दर भाजपचे (BJP) की काँग्रेसचे, (Congress) असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

निवडणुकीत ५५९ मतदार निश्चित झाले होते. १० डिसेंबरला झालेल्या मतदानाच्या वेळी ५५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर ५ मतदारांनी मतदानच केले नाही. आज मतमोजणीतून ते उघड झाले. मोजणीच्या वेळी ५ मते अवैध ठरली. या निवडणुकीत पसंतीक्रम असल्याने मतपत्रिकेवर मतदान करावे लागले. इतर निवडणुकीप्रमाणे ईव्हीएम नव्हते. मतदारांना सर्व उमेदवारांना मत देण्याचा अधिकार होता. परंतु हे मत पसंतीक्रमानुसार देणे आवश्यक होते.

उमेदवारासमोर १ क्रमांक लिहिल्यावर ते ग्राह्य धरण्यात येणार होते. त्यानंतर इतर उमेदवारांना क्रमानुसार मत देता येते. मतमोजणीतील अनेक गंमती जमती समोर आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, २ मतदारांनी मतपत्रिका कोरीच ठेवली. कोणत्याही उमेदवाराला मत दिले नाही. तर एका मतदाराने सर्व तीनही उमेदवारांना क्रमांक १ चे मत दिले. एका मतदाराने मतपत्रिकेच्या मागील बाजूने क्रमांक १ लिहिला. तर एका मतदाराने योग्यरीत्या क्रमांक दिला नाही. त्यामुळे या सर्व पाचही मतदारांचे मत अवैध ठरविण्यात आले.

असा ठरला २७५ या विजयी आकडा..

५५९ मतदारांपैकी ५५४ मतदारांना मतदानाचा हक्क बजावला. यातील ५४९ मतदार वैध ठरले. या वैध मतांना २ भाग करून एक जोडण्यात आला. त्यानुसार २७५ हा विजयाचा आकडा निश्चित झाला. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मत मिळाली. विजयाच्या कोट्यापेक्षा त्यांना ८७ मते अधिकची मिळाली.

नोटाचा पर्याय नाही..

लोकसभा, विधान परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘नोटा’चा पर्याय देण्यात येते. परंतु या निवडणुकीत मतदारांना नोटाचा पर्याय देण्यात आला नव्हता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT