CM Eknath Shinde and MLA Jorgewar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच दावोस येथून मुंबईत परतले. त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठी विदेशी गुंतवणूक आणली आहे. या कामगिरीचे राज्यात स्वागत झाले. यामध्ये विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठीच जवळपास २२ हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे.
मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) मुंबईत परतल्यानंतर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांनी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. संक्रांतीच्या निमित्ताने त्यांनी मुख्यमंत्र्यांना तिळगूळ दिले. तिळगूळ घ्या - गोड गोड बोला’, असे म्हणत आमदार जोरगेवारांनी मुख्यमंत्र्यांकडे या उद्योगांसह रिफायनरी प्रकल्पसुद्धा चंद्रपूरला (Chandrapur) द्यावा, अशी मागणी केली.
सणाच्या निमित्ताने आमदार जोरगेवारांनी गोड बोलून केलेली ही मागणी मुख्यमंत्र्यांनी हसत हसत मान्य केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना भेटून या कामासाठी सहकार्य करण्याची मागणी करणार असल्याचे आमदार जोरगेवारांनी सांगितले.
स्वित्झर्लंड येथील दावोस येथे आयोजित 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये विविध उद्योजकांसमवेत चंद्रपूरसाठी २० हजार ६०० कोटी रुपयाचे दोन मोठे प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार करून येथील बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्मिती आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. राज्यात उद्योग वाढण्यासाठी दावोस (स्वित्झर्लंड) येथील जगभरातील उद्योजकांसोबत मिळून १ लाख ३७ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय गुंतवणुकीचे करार मुख्यमंत्र्यांनी घडवून आणले.
जागतिक आर्थिक परिषदेत चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे प्रकल्पांचे करार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातून हजारो रोजगार निर्माण होणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनचा २० हजार कोटी रुपयांचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प उभारण्याचा करार करण्यात आला असून या प्रकल्पातून १५ हजार जणांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे इस्राईलच्या राजूरी स्टील्स अॅण्ड अलॉईनचा ६०० कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प उभारण्याबाबत करार करण्यात आला असून यातून १ हजार जणांना रोजगार मिळणार आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे ब्रिटनच्या वरद फेरो अॅलाँईजचा १ हजार ५२० कोटींचा स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातून दोन हजार जणांना रोजगार मिळू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.