Bacchu Kadu and Ravi Rana Latest News
Bacchu Kadu and Ravi Rana Latest News Sarkarnama
विदर्भ

राजकीय वातावरण तापलं..प्रहार कार्यकर्त्यांच्या भावना आरपारच्या; बच्चू कडू मुंबईला निघाले...

सरकारनामा ब्यूरो

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील आमदार रवि राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद हा शिगेला पोहचला आहे. त्यांच्यातील या वाद थांबवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करू शकतात.

दरम्यान, प्रहार कार्यकर्त्यांच्या भावना या आरपारच्या असून ते तोडाफोड करून बाहेर निघणार, असे वक्तव्य आमदार बच्चू कडू केल्याने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे. ते आज रात्री मुंबईला निघणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. यामुळे राणा आणि कडू यांच्या वादावर पडदा पडणार का हे पाहावे लागणार आहे. (Bacchu Kadu and Ravi Rana Latest News)

दरम्यान, बच्चू कडू यांनी आमदार राणा यांनी केलेल्या वक्तव्याबाबतची नाराजी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगणार असल्याचे स्पष्ट केले. दोघांची बैठक सोबत होणार की एकत्र याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र प्रहार कार्यकर्त्यांच्या भावना आरपारच्या असून एकदाचं काय ते तोडफोड करून बाहेर पडा, अशा कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचं कडू यांनी सांगितलं त्यामुळे चांगलचं वातावरण तापलं आहे.

आमदार रवि राणा अत्यंत नीच पद्धतीने बोलले असून त्यांनी व्यवस्थित अभिप्राय दिला तर ठीक. त्यानी जे काही आरोप केले याबाबत कार्यकर्त्यांचा समाधान झाले तर १ नोव्हेंबर रोजी दिलेला 'अल्टिमेटम' बाबतचाही विचार करू आणि जी बदनामी केली, ती परत द्यावी, विषय संपला, असेही आमदार कडू यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, आमदार कडू आणि आमदार राणा यांच्या वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वेळ दिल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्याकडून दोघांनाही वेळ दिली आहे. त्यामुळे राणा आज सकाळी मुंबईला गेले आहेत. आता कडू देखील मुंबईला निघणार आहेत. त्यामुळे या वादावर पडदा पडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT