मुंबई : प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू मागील काही दिवसापासून चर्चेत आहेत. बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यासोबत कडू यांचा जोरदार वाद सुरू आहे. राणांनी खोक्यांचे आपल्यावर लावलेले आरोप मागे घ्यावे, नाहीतर एक तारखेला पिक्चर दाखवू ,असे आव्हान कडूंनी एकप्रकारे शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान दिले. आता बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीला दीर्घ मुलाखत दिली. खोक्यांचे आरोप आणि आपल्या आगामी राजकीय वाटचालीवर त्यांनी भाष्य केले आहे.
आंदोलनाचे वीरू आणि आता थेट खोक्यांचे आरोपाचे आमदार हा प्रवास, खोक्यांची चर्चा लोकांमध्ये आहे, या आरोपामुळे निवडणुकीत तुम्हाला काही फटका बसेल असं वाटतं का? या प्रश्नाला उत्तर देताना बच्चू कडू म्हणाले की, लोकं विसरून जातात, तुम्ही दोन दिवसांपूर्वी कोणती भाजी खाल्ली हे तुम्हाला आठवतं का? आज काल लोकं फार काही धरून बसत नाही"
"तुम्ही आम्ही फार व्यक्तिगत स्वरूपाचे झालो आहोत, माझं काय एवढंच पाहणारे लोक झाले आहेत. ही प्रवृत्ती सर्वांमध्ये आहे. माझ्या मध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे या गोष्टी फार काळ टिकून राहत नाही. तसं असतं तर आज देश वेगळ्या ठिकाणी उभा राहिला असता. लोकांमध्ये सार्वजनिक भावना कमी होत आहेत. लोकांमध्ये अशी भावना असती तर आम्ही घरीच जाऊ शकलो नसतो," असेही बच्चू कडू म्हणाले.
तुमची तत्वे कुठे गेली? तुम्हाला कोणीही चालेल का युती करायची असेल तर? असा प्रश्न विचारले असता कडू म्हणाले, 'राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं. राजकारण हे राजकारणासारखंच करावं लागतं. तत्व तत्वासारखी असतात. तत्व आम्ही सोडले का, तर नाही सोडले."
"बाबासाहेब आंबेडकरांनी जे बंड उभारलं ते सामान्य माणसासाठी केलं. काही तत्व त्यांनी कायम ठेवले आणि राजकारणात काही तत्वांची फेरबदल करावा लागला, तो त्यांनी केला. छत्रपतींनीही तो केला. पण मूळ तत्वाला कधीही हात लागला नाही. बाबासाहेबांनी, छत्रपतींनी सामान्य माणसासाठी काम केलं, आम्हीही तेच करू, असे बच्चू कडू म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.