RSS Reshimbag
RSS Reshimbag Nagpur
विदर्भ

RSS Headquarters : संघ मुख्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा सीसी टीव्हीमुळे आला जाळ्यात...

मंगेश गोमासे

Nabpur RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि कविवर्य सुरेश भट स्मृती सभागृहासह रेशिमबाग मैदान बॉम्बद्वारे उडविण्याची धमकी देणारे निनावी पत्र सक्करदरा पोलिसांना मिळाले. यावरुन पोलिसांनी मुख्यालयासह परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली. याप्रकरणी तपासादरम्यान पोलिसांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला अटक केली असून त्याने नेमक्या कोणत्या कारणावरून हे पत्र पाठविले याचा शोध पोलिस घेत आहे.

नागपूर (Nagpur) शहरातील शिवाजीनगरात राहणार सचिन विजयराव कुळकर्णी याने हे कृत्य का केले, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, २५ तारखेला सक्करदरा पोलिस ठाण्यात पोस्टाच्या मार्फत एक निनावी पत्र धडकले. पत्रात संघ मुख्यालय, (RSS Headquarters) सुरेश भट सभागृह आणि रेशिमबाग परिसरात स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. शहर पोलिसांनी खबरदारी म्हणून तिन्ही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात केली. विविध पथके तयार करीत पत्र पाठविणाऱ्याचा शोध घेतला.

काल रात्री दहा वाजता पोलिसांनी सचिन कुळकर्णी यांना ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील कारवाई पोलिसांकडून करण्यात येणार आहे. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक सागर आव्हाड, हवालदार प्रवीण ढुमणे, पोलिस नाईक नितीन राऊत, निलेश शेंद्रे, शिपाई गोविंद देशमुख, दीपक झंझाळ आणि चमू यांनी पार पाडली.

महावितरणचा कार्यक्रम उधळण्याचा कट?

पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या अभियंत्याला पोलिसांनी विचारपूस केली असता, त्यांनी महावितरणाच्या कार्यक्रमात खोडा आणण्यासाठी हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती त्यांनी दिल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. मात्र, ते स्वतः अभियंता असताना, त्यांनी असे का करावे? या मोठा प्रश्‍न पोलिसांना पडला आहे. दरम्यान नातेवाइकांच्या मते, त्यांना मानसिक आजार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

सीसीटीव्हीमुळे आला जाळ्यात..

सचिन विजयराव कुळकर्णी यांनी झिरोमाईल्स या पोस्टातून स्पीड पोस्टद्वारे सक्करदरा पोलिसांना धमकीचे निनावी पत्र पाठविले. या पत्राचा आधार घेत, त्यांनी ज्या पोस्ट ऑफिसरच्या आसपासचे २५०सही सीसीटीव्ही आणि काही शासकीय सीसीटीव्हीचा आधार घेतला. मात्र, यातही त्यांच्या वाहनाचा क्रमांक स्पष्ट नसल्याने बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांचा पत्ता मिळवीत त्यांना ताब्यात घेण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT