Shocking...पोलिस मुख्यालय नव्हे... हा तर ‘सरकारचे जावई पोसण्याचा अड्डा!

बिल्डर, वाळूवाले, इस्टेट एजंट, शेती- उद्योगधंदे असणारेही ‘पेालिस’
Police
Police Sarkarnama
Published on
Updated on

जळगाव : पोलिस (Police) मुख्यालयात सहा-सातशे पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आहे. मात्र, बोटावर मोजण्या इतकेच कर्मचारी इमाने इतबारे खाकीची रखवालदारी करत असून उर्वरित महिला कर्मचारी (Women police) असोत की, पुरुष कर्मचारी पोलिसाचे काम न करता सरकारचा (Home Department) पगार लाटत असल्याचे समजते. हजेरी मास्तर यांच्या तक्रारीच्या प्रकरणातून समोर आले आहे. (Shortage in police sttaion but many doesn`t present at Jalgaon Headquarter)

Police
NCP News: देश विकायला भाजपला बारामतीची जागा हवी आहे का?

कुठलेही काम न करता पगार देणारी सरकारी नोकरी म्हणजे महापालिका असा जळगावकरांचा समज होता. आता मात्र, त्यात बल करुन राखीव पोलिसांचा फौजफाटा सांभाळणारे पोलिस मुख्यालयाची देखील नगरपालिका झाल्याची गत आहे.

Police
`या`मुळे उच्चशिक्षीत सरपंच शीतल नंदन यांना झाली अटक!

पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या साईड ब्रान्चेस, आर्थिक गुन्हे शाखा, एटीएस, एसआयडी, सीआयडी, सायबर क्राईम, लेखा विभाग, विशेष शाखा आणि जिल्ह्यातील सर्व ३४ पोलिस ठाण्यात बाराही महिने मनुष्यबळ कमतरता आहे.

संख्याबळात तफावत

मंजूर संख्याबळ आणि उपलब्ध स्टाफ यांच्यात नेहमीच तफावत असते. बदल्यांच्या वेळेस ठराविक पोलिस ठाणे वगळता कर्मचारीच उपलब्ध नसतात. कारण, कामचुकार पोलिसांनी आपला अड्डा पोलिस मुख्यालय करुन टाकला आहे. मुख्यालयातील हजेरी मास्टरला महिन्याला २ ते १० हजारांपर्यंत ‘खुशाली’ द्यायची अन्‌ काम न करता पोलिस खात्याच्या सर्व सुख-सुविधा आणि लाखाच्या घरातील गलेगठ्ठ पगार लुटायचा कित्ता कामचुकार पोलिस गिरवत आहे.

हजेरी मास्तरला महिन्याला प्रत्येकच कर्मचाऱ्याला महिन्याकाठी २ हजार द्यावेच लागते. नाहीतर तो, खोड मोडण्यासाठी अडचणीच्या ठिकाणी ड्यूटी लावतो. परिणामी रुटीन बिघडू नये म्हणून २ ते ५ हजार महिन्याला देऊन वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी त्याच त्या कर्मचाऱ्यांना आरामाच्या ड्युट्या भेटतात. त्यात आमदार खासदारांचे गार्ड, व्हीआयपी बंदोबस्त, एस्कॉर्ट, कैदी पार्टीचा समावेश होतो. ५ ते १० हजारांची फी देणारे कुठलेच काम करत नाहीत. मात्र, त्यांची हजेरी, परेड अपटुडेट ठेवण्याचे काम हा हजेरीमास्तर करत असतो.

पोलिसांचे ‘साईड बिझनेस’

वाळू ठेकेदार, वाळू वाहतूकदार, बिल्डर, प्रॉपर्टी डीलर, हॉटेल व्यावसायिक, आधुनिक शेतकरी (फळ बागायतदार), अशा विविध उद्योगधंद्यांत कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी केवळ नावाला पोलिस खात्यात आहेत. मंत्री-आमदारांचे खास माणसं हादेखील स्वतंत्र उद्योग आहे. मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून कर्मचारी बदल्या असोत की, अधिकाऱ्यांच्या बदल्या.. इकडून तिकडे करण्यात लाखोंचा व्यवहार दडलेला असतो. यांचा पोलिस असल्याचा समजाला त्यांचा काहीच उपयोग नसला तरी, पोलिस म्हणून ते स्वतःच्या उद्योगासाठी परिपूर्ण उपयेाग करवून घेत असतात.

लपण्याचा अड्डा..

मुख्यालयात आजमितीस सहा-सातशे कर्मचारी राखीव फोर्समध्ये आहेत. त्यात परिक्षण पूर्ण करुन आलेले रिक्रुट, कार्यालयीन स्टाफ, हजेरी मास्टर, कोर्ट पैरवी, कैदी पार्टी, टपाल, दंगा नियंत्रण, राखीव पोलिसबल, आरएसआय, आरपीआय अधिकारी आणि बोटावर मोजण्याइतक्याच ठिकाणी नियमित कामे करणारे पोलिस आहेत. मुख्यालयातील ड्युट्यांमध्ये अंगरक्षक, क्वार्टर गार्ड, जिल्‍हाधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालय गार्ड नियुक्ती, ईव्हीएम गार्ड, पी.पी. निकम यांचे वॉचर्स-एस्कॉर्ट (ॲड. निकम मोजकेच दिवस जळगावात असताना, त्यांची गार्ड तशीच कायम असते) तर विमानतळ, दीपननगर, भुसावळ ट्रेझरी, पांडवाडा या चार ठिकाणी तब्बल ३० कर्मचारी लपवलेले आहेत.

गरजेपेक्षा जास्त कर्मचारी नियुक्त

जिल्ह्यातील ३५ पोलिस ठाण्यात कामासाठी कर्मचारी कमी पडतात. तपासाधिकारी नसतात तर, नेहमीच उपलब्ध मनुष्यबळ कमी असल्याने काम करणाऱ्यांवर अतिरिक्त ताण येतो. मुख्यालयात मात्र ज्या ठिकाणी ४ कर्मचाऱ्यांचे काम असते तेथे १२ लोक नियुक्त केले जातात. जास्तीचे सगळेच ‘जावई’ कॅटेगरीवाले आहेत. त्यात कागदावर नियुक्तीवाले कुणी पाणी सोडण्यासाठी, कुणी एसपी कार्यालय गेटवर, कुणी कर्मचारी वसाहतीत रात्र गस्त, दिवसा गस्तीवर असतो.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com