Nana Patole Sarkarnama
विदर्भ

दोन शाहीर रात्रभर भांडून मनोरंजन करतात, तसे मेळावे झाले, शिंदेंनी भाजपची स्क्रिप्ट वाचली!

भिवंडी पोट निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला त्यांची जागा तेथील जनता दाखवणार आहे, असे नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.

Abhijit Ghormare_Guest

भंडारा : दोन शाहीर रात्रभर भांडून लोकांचे मनोरंजन करतात, अगदी तसेच दोन्ही दसरा मेळावे झालेत, अशी कडवट टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांचीही त्यांनी खिल्ली उडवली. एकनाथ शिंदे हे काल दसरा मेळाव्यात मोदी-शहा यांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवत होते, अशा घणाघाती आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.

काल मुंबई (Mumbai) येथे बिकेसी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर सभेत काँग्रेस वर जबर टिका केली असून उद्भव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मेळाव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याच्या तसेच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेत ठाकरे समर्थकाचा भरणा असल्याच्या आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला होता. त्यावर नाना पटोले (Nana patole) यांनी उपरोक्त तिखट प्रतिक्रिया दिली आहे. दोन शाहीर रात्रभर भांडून लोकांचे मनोरंजन कसे करतात, तसे दसरे मेळावे झाले असून एकनाथ शिंदे हे काल दसरा मे‍ळाव्यात मोदी- शहा यांनी लिहिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवत असल्याचे पटोले म्हणाले.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस पक्षावर केलेले आरोप हास्यास्पद आहेत, असे सांगून काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून लोकांना जोडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत, असे पटोलेंनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद शिंदे गटात गेलेले बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे देण्यात आले आहे, असे विचारले असता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे हे अंतिम क्षण आहेत. त्यामुळे कुणाला किती पदे वाटायची, ती त्यांनी वाटून द्यावी. कारण २०२४ मध्ये मोदी सरकार जाणार, हे निश्‍चित आहे, अशी खोचक प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

भिवंडी पोटनिवडणुकीबद्दल विचारले असता, या निवडणुकीत काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार नाही. आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत, असे ते म्हणाले. या पोट निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला त्यांची जागा तेथील जनता दाखवणार आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले. ते भंडारा येथे पत्रकारांशी बोलत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT