Congres| महापालिका निवडणूका स्वबळावरच लढणार; नाना पटोले

Nana Patole | आज काँग्रेस भवनात आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कोअर कमिटीची बैठक येथे पार पडली.
Nana Patole |
Nana Patole |
Published on
Updated on

पुणे : पुणे महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. आघाडीपेक्षा स्वबळावर लढल्यास पक्षाच्या अधिक जागा निवडून येतील आणि शहरात पक्षसंघटना वाढण्यास मदत होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

आज काँग्रेस भवनात आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कोअर कमिटीची बैठक येथे पार पडली. या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा देखील झाली. पुणे महानगरपालिका निवडणुक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवावी अशी सर्व नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मागणी होती.

Nana Patole |
Supriya Sule|भाजपला पराभव दिसू लागलाय; सुप्रिया सुळेंनी जखमेवर मीठ चोळलं...

आघाडी करून निवडणुका लढविण्याने पक्षाचे नुकसान होईल, असे मत अनेक कार्यकर्त्यांनी मांडले तसेच 'राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीत मदत होत नसल्याने आघाडीचा फायदा काँग्रेसला होत नाही, असेही काहींनी सांगितलंय कार्यकर्त्यांच्या तसेच सर्व नेतेमंडळींच्या आग्रही मागणीचा विचार करता पुणे महानगरपालिकेची निवडणुक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याबाबत एकमत झाले. निवडणुकीसाठी इच्छुकांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात प्रभागाची व पक्ष संघटनेची बांधणी करण्यास सुरूवात करावी, अशी सूचनाही त्यांना पक्षाकडून देण्यात आली.

त्याचबरोबर, पक्षाची उमेदवारी देताना काटेकोर विचार व्हावा. अनेक जण निवडणुकीत उमेदवारी मिळण्यापुरते पक्षाकडे येतात, पण निवडणूक झाल्यानंतर फिरकतही नाहीत. अशा लोकांमुळे पक्षाला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे अशांना उमेदवारी देण्यापेक्षा पाच वर्षे पक्षाच्या झेंड्याखाली नियमित कार्यक्रम घेणाऱ्यांनांच उमेदवारीसाठी प्राधान्य दिले जावे, असे मत माजी मंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com