MLA Vijay Wadettiwar
MLA Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Wadettiwar : ..तर ती आनंद भेट ठरली असती, असं का म्हणाले आमदार विजय वडेट्टीवार ?

चेतन देशमुख

यवतमाळ : सध्याचे भाजप सरकार खासगीकरणाच्या मागे लागले आहे. देशातील १९२ रेल्वेस्थानक उद्योगपतींना दिली आहेत. त्यामुळेच प्लटफार्म तिकिटाचे दर पाच रुपयांवरून ५० रुपये झाले आहेत. महागाई वाढत असताना केंद्र शासनाचे याकडे लक्ष नसून, ते राजकारण करीत आहेत. देशाचे अर्थमंत्री हास्यास्पद विधान करीत आहेत. आनंद भेट म्हणून गरिबांना धान्य देण्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे सिलिंडरचे दर वाढविले आहेत. सिलिंडरचे दर कमी झाले असते, तर ती खरी आनंद भेट ठरली असती, असे राज्याचे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले.

येत्या काळात बँकांचे खासगीकरण करण्याचा डाव भाजपचा (BJP) आहे, असा घणाघाती आरोपही विजय वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. देशातील सध्याची परिस्थिती पाहिल्यास राजकारणासाठी तेढ निर्माण केले जात आहे. समाजात विष पेरण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेकांची मने दुभंगली आहेत. ही मने भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जोडण्याचे काम काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) करीत आहेत, असे आमदार वडेट्टीवार म्हणाले.

राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी यात्रेत जिल्ह्यातून पाच हजार पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज काँग्रेसच्या येथील जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, प्रा. वसंत पुरके, वामनराव कासावार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे, मुंबई बाजार समितीचे संचालक प्रवीण देशमुख, मनीष पाटील, बाळासाहेब मांगुळकर, राहुल ठाकरे, माजी आमदार विजया धोटे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वंदना आवारी आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT