Mp Bhavana Gawali
Mp Bhavana Gawali Sarkarnama
विदर्भ

संजय राठोडांसोबत आता मतभेद नाहीत, शिंदे गटाच्या माध्यमातून शिवसेनेचे काम करणार...

अतुल मेहेरे

यवतमाळ : पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज यवतमाळ जिल्ह्यात आली आहे. प्रशासनाचे सर्व अधिकारीही माझ्यासोबत आहेत. नुकसानाची पाहणी करण्यासाठी उशीर झालेला नाही, असे खासदार भावना गवळी 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाल्या.

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या बाभूळगाव तालुक्यातील सरूळ या गावात पाहणी करण्यासाठी खासदार गवळी आल्या होत्या. मुख्यमंत्री (Chief Minister) आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विदर्भासाठी (Vidarbha) विशेष पॅकेज देण्याची मागणी केली आहे. शेतांमध्ये पाणी शिरले, त्याचप्रमाणे गावातील लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरून प्रचंड नुकसान झालेले आहे. सरूळ या गावांलगत खर्डा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. या मागणीचा पाठपुरावा आता मी करणार आहे. असे भावना गवळी (MP Bhavana Gawali) म्हणाल्या. सर्वे मधून कोणीही सुटू नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

शिवसेनेच्या महिलांनी यवतमाळात आज खासदार भावना गवळी यांना गद्दार संबोधून त्यांचा निषेध केला. याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, मी माझे काम करते आहे. कारण मी विकासाची कास धरलेली आहे. त्यामुळेच सतत पाचव्यांदा मी खासदार म्हणून निवडून आले आणि कोण काय आहे. हे येणारा काळच सांगतो. त्यामुळे त्यांचे काम त्यांनी करावे. मी माझ्या मार्गावरून चालत राहणार, असे त्या म्हणाल्या. शेवटी एखाद्याचं कामच त्याला मोठ करत असतं. त्यामुळे अशा आरोपांना मुळीच महत्त्व देण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात आता संघर्ष होईल का, असे विचारले असता, ज्यांना असा संघर्ष करायचं असेल त्यांनी खुशाल करावा. पण या भानगडीत पडण्याची आमची मुळीच इच्छा नाही.

पूरग्रस्त गावात आज शेतकऱ्यांच्या बांधावर मी आले आहे आणि अशा कामांमध्ये लोकांसाठी धावून जाणे हे लोकप्रतिनिधीचे काम आहे. तेवीस वर्ष झाले मी खासदार म्हणून जनसेवा करत आहे. त्यामुळे अशा संघर्षात मी पडणार नाही, असे खासदार गवळी म्हणाल्या. विकासाचे विषय घेऊन मी काम करत आले आहे. त्यामुळेच पाचव्यांदा जनतेने मला खासदार म्हणून निवडून दिले. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळत नव्हते. त्यावेळी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मोर्चे आंदोलने करून शेतकऱ्यांना ती रक्कम मिळवून दिली. हे प्रतिनिधीचे काम आहे आणि ते मी करते आहे, असेही त्या म्हणाल्या.

ईडी कारवाईच्या दरम्यान भावना गवळी मतदारसंघात फिरकल्याच नाहीत. या टीकेला उत्तर देताना त्या म्हणाल्या की तेव्हा मी अडचणीत होते आणि कायदेशीर लढाई लढत होते. पण मी मतदार संघात फिरकलेच नाही, हा आरोप धादांत खोटा आहे. भलेही जाहीर कार्यक्रमांमध्ये मी गेले नसेल, पण मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी घेणे, त्यांचे प्रश्न जाणून घेणे काम करणे हे सर्व काही सुरू होते. माझ्या ऑफिसमध्ये लोकही सोळा सोळा अठरा-अठरा तास काम करतात आणि त्या काळातही हे काम अविरत सुरू होते. यापुढेही एक लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या कामांमध्ये कुठलाही कसूर केला जाणार नाही, असे त्या म्हणाल्या.

मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आमचे कार्यालय असायलाच पाहिजे. कारण कार्यालय असेल तेव्हा जनतेची कामे सुरळीतपणे मार्गी लागू शकतील त्या कार्यालयांमध्ये बसून आमची मंडळी चर्चा करतील, निर्णय घेतील आणि तिथूनच कामांना दिशा देता येईल. त्यामुळे कार्यालय आवश्यक आहे आणि तेच झाले पाहिजे, असे स्पष्ट मत खासदार गवळी यांनी व्यक्त केले. कार्यालयातूनच पक्ष आणि संघटन बळकटीसाठी काम करता येईल असेही त्यांनी सांगितले.

रस्ता वेगळा असू शकतो, मात्र ध्येय एकच...

मंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्यामधला वाद काही नवीन नाही. पण आता आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही. आम्ही विकासाचा काम करतोय. रस्ते भलेही वेगवेगळे असू शकतील. पण आमचे ध्येय एकच आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, असे यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT