Sanjay Gaikwad, Vijayraj Shinde
Sanjay Gaikwad, Vijayraj Shinde sarkarnama
विदर्भ

शिंदे गटाची कोंडी करण्यासाठी ठाकरेंचा प्लान; मोठा नेता पुन्हा शिवबंधन बांधणार?

सरकारनामा ब्यूरो

बुलडाणा : राज्यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena) पक्ष अ‍ॅक्शन मोडवर आला आहे. यवतमाळमध्ये मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी माजी मंत्री संजय देशमुख शिवबंधन बांधनार असतानाच दुसरीकडे बुलडाणा (Buldhana) विधानसभा मतदार संघातही शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांना धक्का देण्याची रणनिती सुरु आहे.

यासाठी ठाकरे गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे तीन वेळेस आमदार असलेले आणि सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार विजयराज शिंदे (Vijayraj Shinde) हे पुन्हा शिवबंधन बांधणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार गायकवाड अडचणीत येणार असल्याचे सांगितले जात आहे.

या मतदार संघात तीन वेळा आमदार राहिलेल्या विजयराज शिंदे यांच्याकडून आव्हान देण्याची रणनिती ठाकरे गटाकडून आखल्या जात असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात होत आहे. विजयराज शिंदे आणि संजय गायकवाड यांच्यामध्ये मध्यतरी मोठा वाद झाला होता. शिंदे ठाकरे गटात दाखल झाल्यास गायकवाड यांची डोकेदुखी वाढू शकते.

विजयराज शिंदे कधी शिवबंधन बांधतील याबाबत एका वृत्तवाहिनीने बोलताना ते म्हणाले, ही लोकशाही आहे... मी १५ वर्षात शिवसेनेचा आमदार म्हणून केलेल्या कामाची कुणी दखल घेत असेल तर वावगं काय आहे...? मात्र, अद्यापतरी उद्धव ठाकरे गटाच्या कुठल्याच मोठ्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क केलेला नाही. मात्र, बुलडाण्यात आता बंडखोर आमदार गायकवाड यांना शह देण्यासाठी हालचालींना वेग आल्याच चित्र राजकीय वर्तुळात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT