देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान : 'अजितदादा स्वतः अस्वस्थ आहेत'

आमच्या सरकारमध्ये कोणीही अस्वस्थ नाही. आम्ही हे सरकार पूर्ण काळ चालवू.
Ajit Pawar-Devendra Fadnavis
Ajit Pawar-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : राज्यातील सत्ता गेल्यामुळे अजितदादा पवार (Ajit Pawar) स्वतः अस्वस्थ आहेत, त्यामुळे ते आमच्या सरकारविषयी असं बोलत आहेत. आमच्याकडे कसलीही अस्वस्थता नाही. यापुढील अडीच वर्ष आम्ही हे सरकार चालवून दाखवू, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिले. (Ajit Pawar himself is restless : Devendra Fadnavis)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अस्वस्थता आहे, त्यामुळे हे सरकार काही दिवसांतच पडेल, असे भाकीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. त्याबाबत नागपूरमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वरील उत्तर दिले.

Ajit Pawar-Devendra Fadnavis
माझ्या पाठीशी मोदी-शहा-फडणवीसांची ताकद; निवडणुकीत ठाकरेंनाही हरवेन : आमदाराचे खुले आव्हान

फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारमध्ये कोणीही अस्वस्थ नाही. आम्ही हे सरकार पूर्ण काळ चालवू. त्यानंतरच निवडणुकीत पुन्हा एकदा निवडून येऊ. महाराष्ट्रात आता एक स्थिर, गतीशील आणि काम करणारे सरकार आलेले आहे.

Ajit Pawar-Devendra Fadnavis
Andheri By-Election : मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज बाद करा; शिवसेनेने घेतले 'हे' आक्षेप

दरम्यान, प्रा. जी. एन. साईबाबा यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली होती. त्याला राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाचा निर्णय रद्द केला आहे. त्यावरही फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

Ajit Pawar-Devendra Fadnavis
माझ्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमागे सांगलीपासून मुंबईपर्यंत अनेकांचा ‘हात’ : विश्वजित कदमांचा रोख कुणाकडे?

फडणवीस म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी (ता. १४ ऑक्टोबर) दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज (ता. १५ ऑक्टोबर) स्थगित केला आहे. नक्षलवाद्यांना राष्ट्रविघातक कार्यात मदत केल्याचा आरोप असलेले प्रा. जी. एन. साईबाबाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या या निकालामुळे शहीदांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो.

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. १४ ऑक्टोबर) खंडपीठ गठीत करुन आज त्यावर तातडीने सुनावणी घेतली, याबद्दलही मी सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहे. जे पोलिस आणि जवान नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले, त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देणारा आजचा हा निकाल आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com