Devendra Fadnavis Sharad Pawar Meeting Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis On Pawar Meeting: ''...त्यामुळे मी तुमच्या ज्ञानात भर घालू शकत नाही!''; पवारांच्या 'गुप्त' भेटीवर फडणवीस थेटच बोलले

Maharashtra Politics : ''...मग अजित पवार आणि शरद पवार का भेटू शकत नाहीत ?''

सरकारनामा ब्यूरो

Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै महिन्यात फूट पडली. अजित पवार यांच्यासह काही नेत्यांनी थेट शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सातत्याने शरद पवार यांनी ही भूमिका मान्य करावी यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. भविष्यातलं राजकीय गणित लक्षात घेऊन दोन्ही गट एकत्र व्हावेत अशी भाजपाची इच्छा आहे. अजित पवार हे देखील यासाठी प्रयत्नशील आहेत.

याचदरम्यान, शनिवारी शरद पवार आणि अजित पवारां(Ajit Pawar)मध्ये गुप्त भेट झाल्याचे समोर आले आहे. यावर राजकीय नेतेमंडळींकडून उलट-सुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. मात्र,आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले,मला या भेटीविषयी काहीही माहित नाही. ही भेट झाली का? भेट झाली तर त्यात काय चर्चा झाली? यासंदर्भातला कुठलाही तपशील माझ्याकडे नाही. भेट कुठे झाली? किती वेळ चर्चा झाली याविषयी काहीही माहित नाही त्यामुळे मी तुमच्या ज्ञानात भर घालू शकत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी हसत हसत सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस महामंडळ वाटपाचा फॉर्म्युल्यावर म्हणाले, “एक समन्वय समिती तयार केलीय. ही समन्वय समिती ठरवेल. कुठलं महामंडळ, कुणाला द्यायचं अजून काही ठरलेलं नाही असंही त्यांनी म्हटलं.

''...मग अजित पवार आणि शरद पवार का भेटू शकत नाहीत ?''

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी शरद पवार-अजित पवारांच्या भेटीवर भाष्य केले. राऊत म्हणाले, दोन्ही नेत्यांमधील भेटीबाबत माध्यमांतून ऐकलं. अद्या दोन्ही नेत्यांनी यावर भाष्य केलेलं नाही. नवाज शरीफ आणि मोदी भेटू शकतात. मग अजित पवार आणि शरद पवार का भेटू शकत नाहीत असा सवाल करत यावर शरद पवार येत्या दोन ते तीन दिवसांत बोलतील असे कळल्याचे राऊत म्हणाले.

'' ईडीची नोटीस आणि या बैठकीचा काही संबंध नाही!''

शरद पवार-अजित पवार यांच्यातील भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, मी पवारांबरोबर तिथे गेलो आणि लगेच निघून आलो. दोघांमध्ये काय चर्चा झाली? हे मला माहीत नाही. महायुतीत सामील होण्याबाबत मी आधीच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. ईडीचा आता विषयच नाही. त्यामुळे ईडी(ED) ची नोटीस आणि या बैठकीचा काही संबंध नाही असेही ते स्पष्ट म्हणाले.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, हे मला माहीत नाही. मी शरद पवारांबरोबर बैठकीच्या ठिकाणी गेलो होतो, त्यानंतर लगेच तिथून निघून आलो, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT