Sharad Pawar-Ajit Pawar Meeting : शरद पवार-अजित पवारांच्या भेटीवर दादा गटातील नेत्याचे भाष्य....

NCP Leader : कोणत्याही कुटुंबात काही कारणास्तव तणाव निर्माण झाला असेल तर आणि तो ताणतणाव जर निवळत असेल तर ते स्वागतार्ह म्हणावे लागेल
Sharad Pawar-Ajit Pawar_Umesh Patil
Sharad Pawar-Ajit Pawar_Umesh PatilSarkarnama

Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या भेटीवरून सध्या तर्क वितर्क लावले जात आहेत. शरद पवार आमचे दैवत आहेत, त्यांच्याबद्दलचा तसूभरही आदर आमच्या मनातून कमी झालेला नाही. प्रत्येकवेळी काही तरी डोक्यात ठेवूनच भेटायचं, असं नसतं, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्या भेटीवर दिले. (Umesh Patil said on Sharad Pawar-Ajit Pawar meeting)

उमेश पाटील म्हणाले की, शरद पवार हेच आमचे पहिल्यापासून दैवत आहे. राजकीय जीवनात काही वेगळ्या खेळाव्या लागल्या असल्या, राजकीय जीवनात काम करत असताना कधी वेगळ्या भूमिका घेतल्या असतील तरी शरद पवार यांचे स्थान आमच्या आयुष्यात कायम आहे.

Sharad Pawar-Ajit Pawar_Umesh Patil
Ganpatrao Deshmukh Statue Inauguration : विधीमंडळ आवारात गणपतरावआबांच्या पुतळ्याचे काम का सुरू झाले नाही?; फडणवीसांनी सांगितले कारण...

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात, तसेच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये जरी भेटीगाठी होत असतील, सकारात्मक चर्चा होत असेल तर ते चांगलेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची जडणघडण ही शरद पवार यांच्या विचारातून व संस्कारांतूनच झालेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांच्या मुशितच तयार झालेले नेते आहेत, असेही उमेश पाटील यांनी नमूद केले.

Sharad Pawar-Ajit Pawar_Umesh Patil
Ganpatrao Deshmukh Statue Inauguration : गणपतराव देशमुख म्हणजे ‘वन मॅन आर्मी’; फडणवीसांकडून आबासाहेबांच्या आठवणींना उजाळा

आजपर्यंत शरद पवार यांनी कधीही अजितदादांना अंतर दिलेले नाही. तसेच, अजित पवार यांनीही कधी शरद पवार यांना अंतर दिलेले नाही. कोणत्याही कुटुंबात काही कारणास्तव तणाव निर्माण झाला असेल तर आणि तो ताणतणाव जर निवळत असेल तर ते स्वागतार्ह म्हणावे लागेल, अशी पुष्टीही उमेश पाटील यांनी या वेळी जोडली.

Sharad Pawar-Ajit Pawar_Umesh Patil
Solapur First It Park : तुम्ही आता सोलापुरात आलात, येथून परत जायचं नाही; शरद पवारांची उद्योजकांना सूचना

उमेश पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी दोन गट पडले असले तरी कुठेही दोन्ही गटांमध्ये टीकाटिपण्णी, आरोप प्रत्यारोप होताना दिसत नाहीत, हे या पार्टीचे संस्कार मानले जातात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com