MLA Sudhir Mungantiwar
MLA Sudhir Mungantiwar Sarkarnama
विदर्भ

असे दृढ झाले आमदार सुधीर मुनगंटीवार आणि गुरुकुंज मोझरीचे नाते…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ (गुरुकुंज) मोझरीच्‍या संचालक मंडळाच्‍या अध्‍यक्षपदी माजी आमदार पुष्‍पाताई बोंडे यांची तर उपाध्‍यक्षपदी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. काल चंद्रपूरला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आमदार मुनगंटीवार आणि गुरूकुंज मोझरीचे नाते टप्याटप्याने दृढ होत गेले आहे.

वंदनीय राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज (Tukadoji Maharaj) यांचे नाव नागपूर (Nagpur) विद्यापीठाला देण्‍यात यावे, या मागणीसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आवाज बुलंद केला होता. विविध संविधानिक आयुधे वापरून केलेल्‍या संघर्षाला यश प्राप्‍त झाले आणि त्यानंतर जेव्‍हा श्री गुरुकुंज आश्रम मोझरी येथे त्‍यांचे स्‍वागत करण्‍यात आले. त्‍यावेळी त्‍यांना राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज ज्‍या गादीवर बसायचे, त्या गादीवर सन्मानपूर्वक बसविण्‍यात आले. त्‍यानंतर अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाशी आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांचा निकटचा व जिव्हाळ्याचा संबंध आला.

गुरुदेव भक्‍तांच्‍या अनेक मागण्‍यांसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्‍याने पाठपुरावा केला. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्‍या पदाधिका-यांनी त्यांना आजीवन विश्वस्त म्‍हणून नियुक्‍त केले. वंदनीय राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्‍न या सर्वोच्‍च उपाधीने मरणोत्‍तर सन्‍मानीत करण्‍यात यावे, या गुरुदेव भक्‍तांच्‍या मागणीचा ते सातत्‍याने पाठपुरावा करीत आहेत. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्‍यावरील त्यांची श्रध्‍दा, गुरुदेव भक्‍तांसाठी असलेला जिव्‍हाळा यातून आमदार मुनगंटीवार यांचे गुरुकुंज मोझरीशी नाते निर्माण झाले आणि दिवसागणिक ते दृढ होत गेले.

अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्‍या अध्‍यक्षपदी माजी आमदार पुष्‍पाताई बोंडे आणि उपाध्‍यक्षपदी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची निवड झाल्‍याबद्दल संचालक मंडळाने दोघांचेही अभिनंदन केले. यापुढील काळातही अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्‍या माध्यमातून वंदनीय राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्‍या विचारांचा प्रसार व प्रचार करण्‍याचे कार्य आपण श्रध्‍दापूर्वक करू, असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT