Gondia Murder. Sarkarnama
विदर्भ

Gondia : रोखण्याऐवजी बापानेच गुन्ह्याकडे लोटले; वादातून मुलांच्या मित्राला कायमचे संपविले

अभिजीत घोरमारे

Crime News : मुलांना संस्कार देण्यात आईप्रमाणे वडिलांची भूमिकाही महत्त्वाची असते. वडीलच मुलांना गुन्हा करायला भाग पाडत असतील तर संपूर्ण कुटुंबावार संकट ओढवते. गोंदिया येथे असाच प्रकार घडला आहे. मुलांना त्यांच्या मित्रासोबत झालेला वाद मिटविण्याऐवजी पित्याने सोबत घेत एकाचा काटा काढला. कुडवातील इंजिनिअरिंग कॉलेजजवळ ही घटना घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

उधारीच्या पैशांवरून हा वाद झाला. बाप-लेकांसह अन्य दोघांनी मिळून तरुणाला ठार केले. रामनगर पोलिस ठाण्याअंतर्गत ग्राम कुडवा येथील घटनेत मनीष ऊर्फ ईश्वर भालाधरे (वय 30, रा. आंबेडकर चौक, कुडवा) याचा मृत्यू झाला. प्रवेश ऊर्फ लक्की राजकुमार मेश्राम (रा. आंबेडकर चौक, वॉर्ड क्रमांक-3, कुडवा), मनीष भालाधरे आणि राहुल बरेले हे तिघे इंजिनिअरिंग कॉलेजसमोर सिगारेट ओढत होते.

संतोष रामेश्वर मानकर यांच्या लकी रेस्टॉरंटमध्ये ते बसले होते. येथे त्यांचा मित्र प्रवेश मेश्राम याच्याशी उधारीच्या पैशावरून वाद झाला. संतोष मानकरने प्रवेश मेश्राम, मनीष भालाधरे आणि राहुल बरेले यांना मारहाण केली. डोळ्यात तिखटही फेकले. संतोष मानकर, लक्की ऊर्फ लोकेश संतोष मानकर, पवन संतोष मानकर, जॉर्डन ऊर्फ मोहित शेंडे आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने (सर्व रा. कुडवा) यांनी लोखंडी रॉड, कुऱ्हाड, कोयता आदी घातक शस्त्रांनी वार करून मनीषला ठार केले. प्रवेश मेश्राम यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या निर्देशाप्रमाणे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. रामनगर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके नेमली. पथकांनी संतोष मानकर, लक्की संतोष मानकर, पवन संतोष मानकर आणि विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. जॉर्डन शेंडे हा फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. यातील संतोष मानकर, लक्की संतोष मानकर, पवन संतोष मानकर यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरोपींना काही तासांत पकडण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. कुडवा परिसरात महिनाभरात खुनाची ही दुसरी घटना आहे. परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. क्षुल्लक वादातून खुनासारख्या घटनांमुळे सध्या या भागातील नागरिक चिंतेत आहेत. परिसरातील पोलिस गस्त वाढवित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर नियंत्रण मिळविण्याची मागणी गोंदियातील नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे.

Edited by : Prasannaa Jakate

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT