Tumsar Crime Sarkarnama
विदर्भ

Tumsar Crime News : संतोषला जिवंत सोडणे नईमला पडले महागात, संतोषने ‘असा’ काढला काटा !

Nagpur : नागपूर येथील सात आरोपी मित्रांसोबत मिळून हे हत्याकांड घडवून आणले.

अभिजीत घोरमारे

Bhandara District Tumsar Crime News : मोक्का प्रकरणातील सराईत आरोपी नईम शेखची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून खून झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ आज (ता. २५) सायंकाळच्या सुमारास घडली. या हत्याकांड प्रकरणात विश्वसनीय सूत्राकडून महत्त्वपूर्ण माहिती ‘सरकारनामा’च्या हाती लागली आहे. (The seven accused from Nagpur along with their friends carried out this murder)

सध्या फरार असलेला या हत्याकांडाचा मुख्य आरोपी संतोष दहाटने आपल्यावर झालेल्या हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी नईम शेख खानचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. तडीपार असलेला कुख्यात गुंड संतोष दहाटने आपल्या नागपूर येथील सात आरोपी मित्रांसोबत मिळून हे हत्याकांड घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे.

काही कामानिमित्त बालाघाट तिरोडीवरूण मृतक नईम शेख, आपले साथीदार कालू माटे, जावेद पठाण आणि शहीद पठाण सोबत चार चाकी वाहनाने तुमसर कडे येत होते. संतोष दहाट आपल्या सात साथीदारांसोबत त्यांचा पाठलाग करत होता. गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ येताच ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्या नईम खान वर सुरुवातीला गोळी झाडण्यात आली.

पहिली गोळी कारच्या दाराला लागली. दरम्यान गाडी थांबवून नईम शेखवर धारदार चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्याच्या वेळी नईमचे तिन्ही साथीदार पळून गेले. नईम मेल्याचे समजताच संतोष दहाट व त्याचे साथीदार घटना स्थळावरून पळून गेले. पुढे मृतक नईमच्या साथीदारांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे नईम खान याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. विशेष बाब अशी की या प्रकरणी चार आरोपींना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व आरोपी नागपूरचे आहेत. त्यांनी संतोष दहाटने प्रकरण घडवून आणल्याचे कबूल केले आहे.

असा आहे इतिहास..

दोन वर्षांपूर्वी मृतक नईम शेखने तडीपार गुंड संतोष दहाटवर गोळीबार केला होता. त्यात संतोष दहाट वाचला. तेव्हापासून तो नईम शेखच्या मागावर होता. आज संधी मिळताच त्याने नईम शेखचा ‘गेम’ केला. भंडारा पोलिस मुख्य आरोपी संतोष दहाटचा शोध घेत आहेत. बॅटरी व्यावसायिक आणि नंतर वाळू तस्करीचा म्होरक्या झालेला मोक्काच्या आरोपीचा झालेला असा झालेला अंत चर्चेचा विषय ठरला आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT