Chandrapur News: राज्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नसल्याची टीकाही विरोधकांकडून सरकारवर नेहमीच केली जाते. याचदरम्यान,विदर्भातील चंद्रपूरमधून एक हादरवणारी बातमी समोर येत आहे.
भाजपच्या दोन महिला नेत्यांना चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही महिलांवर नवजात बाळाच्या विक्रीचं रॅकेट चालवत असल्याचा समोर आलं आहे. पोलिसांनी केलेल्या तपासातून ही बाब उघड झाली आहे. या घटनेनंतर चंद्रपूरमध्येतीव्र संतापाची लाट उसळल्याचंही दिसून आलं.
चंद्रपूर पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत संबंधित महिला भाजप पक्षाच्या पदाधिकारी असल्याचं पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आलं आहे, या प्रकरणी दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून सध्या या भाजपच्या दोन महिला नेत्यांची कसून चौकशी सुरू आहे.
चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी नवजात बाळांच्या विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित महिला आरोपी सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे या भाजप आमदाराच्या कार्यकर्त्या असल्याचं बोललं जात आहे.
पोलिसांनी या प्रकरणी यापूर्वी चार जणांना अटक केली आहे. त्यात प्रियकर अजय फुलझेले यानं पीडित मुलीवर अत्याचार केले होते. त्यातून ती गरोदर राहिल्याचं समोर आलं होतं. यानंतर या पीडित मुलीनं एका बाळाला जन्म दिला. हेच बाळ खरेदी करणाऱ्या दोन महिलांना याआधीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईलाही अटक केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.