ShivsenaUBT News: आदित्य ठाकरेंचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं हे शेवटचं अधिवेशन...'

Shivsena Vs BJP: माजी मंत्री व वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि मातोश्रीशी थेट कनेक्ट असलेले सचिन अहिर हेही नुकतेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांच्याकडे तात्काळ विधानपरिषदेच्या उपसभापती पदी वर्णी लागली आहे. अहिरांच्या धक्क्यानंतर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी मोठं विधान केलं आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Aaditya Thackeray’
Aaditya Thackeray’s CM Devendra Fadnavis Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दोन तगडे झटके बसले आहेत. सहा खासदारांनंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांच्यासारखा दिग्गज नेताही अचानक धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोटात दाखल झाला आहे. या फोडाफोडीच्या राजकारणामागे एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी महत्त्वाची भूमिका असल्याची जोरदार चर्चा आहे. याचदरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी धक्कादायक दावा केला आहे.

माजी मंत्री व वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि मातोश्रीशी थेट कनेक्ट असलेले सचिन अहिर हेही नुकतेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांच्याकडे तात्काळ विधानपरिषदेच्या उपसभापती पदी वर्णी लागली आहे. अहिरांच्या धक्क्यानंतर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी मोठं विधान केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा कमकुवत करण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रातील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत असून फडणवीस यांच्या राष्ट्रीय राजकारणातील स्थानाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा खळबळजनक दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांनी इंडिया टीव्हीशी विविध मुद्द्यांवर तसेच चर्चेतील राजकीय घडामोडींवर महत्त्वपूर्ण भाष्य केलं.

आदित्य ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री म्हणून हे शेवटचं विधिमंडळ अधिवेशन आहे. हे माझे शब्द लिहून ठेवा, असा दावा करत महाराष्ट्राच्या राजकारणात आदित्य ठाकरेंनी खळबळ उडवून दिली आहे. तसेच फडणवीस हे लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात दिसून येतील असंही विधान केलं आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Aaditya Thackeray’
Gram Panchyat: राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींबाबत फडणवीस सरकार घेणार मोठा निर्णय; ग्रामविकास मंत्र्यांनी दिली अपडेट

राज्यात जे काही सुरू आहे, हे तर ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ आहे. राष्ट्रीय राजकारणात आणि राज्यात ज्या घडामोडी घडत आहेत. त्यात आमच्या शिवसेनेचा नाहक बळी जात आहे. महाराष्ट्रात ज्या ताज्या राजकीय घडामोडी घडल्या, त्या ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीसचा भाग असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, एकेकाळी राष्ट्रीय राजकारणात ज्यांना संभाव्य दावेदार समजले जात होते, त्यांना एक एक करून पद्धतशीरपणे बाजूला सारले गेले. सध्या राज्यात एकनाथ शिंदेंच्या राजकीय हालचाली या भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या इशाऱ्यावर होत आहेत.

यातून शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत राहणार नाहीत, असा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद मिळवण्याचा प्रयत्न करतील, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Aaditya Thackeray’
Maharashtra Politics: मोठी बातमी: ज्याची भीती होती तेच घडलं; सचिन अहिर यांच्यानंतर महाविकास आघाडीचा आणखी एक आमदार फुटला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या दाव्याला पुष्टी देतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांचा संदर्भ दिला आहे. ते म्हणाले, नितीन गडकरी हे तिसऱ्यांदा भाजपाचे अध्यक्ष होऊ घातले, तेव्हा त्यांच्याबद्दलचे वाद तसेच पूर्ती घोटाळा आणि इतर विषयही समोर पुढे आणण्यात आले.

तसेच शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून नावाजले जात असताना त्यांना अचानक केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यात आले, असे आदित्य ठाकरे म्हणाले. विशेष म्हणजे याच मुद्द्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही परखड मांडताना अमित शाह यांच्या अँगलही पुढे आला होता.

राज ठाकरे यांनी राज्यात शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, नीट पेपरफुटी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी असे गंभीर प्रश्न असताना राजकीय नेते आमदार-खासदार फोडण्यात व्यस्त असल्याची टीका केली होती. तसेच खासदारांना फोडून अमित शाह त्यांची 2029च्या निवडणुकांची तयारी सुरू असल्याचा दावा केला होता.

भाजपमधून जर आपल्याला विरोध झाला तर इतर गटांमधून पाठिंबा मिळण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. भाजपमध्येही प्रचंड अंतर्गत गोंधळ सुरू आहे. पण मोदींमुळे ते शांत आहेत. येत्या वर्षभरात राज्यात किंवा देशातही मोठे बदल होऊ शकत असल्याची चर्चा असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com