Devendra Fadnavis, Eknath Shinde, uday samant Sarkarnama
विदर्भ

Eknath Shinde : सामंतांनी डाव फिरवला; शिंदेंना सेफ करत CM फडणवीसांना आणलं गोत्यात

Eknath Shinde : यवतमाळ शहरातील नळ पाणी योजनेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होणारे आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खोडून काढले आहेत.

Hrishikesh Nalagune

यवतमाळ शहरातील नळ पाणी योजनेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होणारे आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खोडून काढले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावर या योजनेसंबंधी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नव्हते. तसेच नगर विकासमंत्री देखील नव्हते, असे सामंत यांनी पुराव्यांसह स्पष्ट केले.

यवतमाळ जिल्ह्यातील अमृत योजनेंतर्गत निकृष्ट पाईपलाईन टाकल्याचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाले आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयाने यास जबाबदार कोण याचे उत्तर सादर करण्यास राज्य शासनाला निर्देश दिले होते. यावर मंगळवारी झालेल्या सुनावणीत राज्याच्या विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथपत्रातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच यासाठी जबाबदार धरले आहे.

पण एकनाथ शिंदे यांच्यावर या योजनेसंबंधी होणारे आरोप बिनबुडाचे असल्याचे उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, यवतमाळचे तत्कालीन पालकमंत्री मदन येरावार यांनी यवतमाळ शहरातील नागरिकांना नळ पाणी योजनेची मागणी केली होती. या योजनेचे पहिली निविदा अडके नावाच्या व्यक्तीला मिळाली होती. मात्र योजनेचे काम लवकर व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार जय बालाजी या कंपनीला कंत्राट देण्यात आले होते.

मात्र पाइपलाईन टाकताना पाईप फुटल्याने तेथील शेतकऱ्याचे नुकसान झाले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी 59 लाख 68 हजार 33 रुपये भरपाई म्हगून शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर या योजनेसंबंधी केलेल आरोप बिनबुडाचे आहेत. तसेच गुलाबराब पाटील यांचाही थेट संबंध नाही. सामंत यांनी योजनेची कागदपत्रही माध्यमांसमोर सादर केली. त्यामुळे सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना सेफ करत फडणवीस यांना गोत्यात आणले आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT