Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी संधी साधली; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर केली राष्ट्रवादीची कोंडी ?

Dhananjay Munde resignation News : गेल्या काही दिवसापासून शिंदे सेनेच्या विरोधात संधी मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसने घेरले होते. आता ही संधी साधत शिवसेनेने राष्ट्रवादीच्या विरोधात रस्त्यावर उतरून कोंडी केली.
ajit pawar, eknath shinde, dhananjay munde
ajit pawar, eknath shinde, dhananjay munde sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाचा सहभाग असल्याचे पुढे आल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यातच सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर त्यांच्या हत्येच्या वेळेची छायाचित्र समोर आली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आगडोंब उसळला. त्यानंतर धनंजय मुंडे यांना तातडीने राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडेंचा राजीनामा होताच शिंदे सेना आक्रमक झाली आहे. गेल्या काही दिवसापासून शिंदे सेनेच्या विरोधात संधी मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसने घेरले होते. आता ही संधी साधत शिवसेनेने राष्ट्रवादीच्या विरोधात रस्त्यावर उतरून कोंडी केली.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर त्यांच्या हत्येच्या वेळेची छायाचित्र समोर आली. त्यामुळे तर राज्यातील जनमत पूर्णपणे धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) विरोधात गेले आहे. या सर्व बाबीची खात्री पटताच शिंदेंच्या शिवसेनेने सर्वत्र रस्त्यावर उतरून आंदोलन सुरु केले आहे. या प्रकरणात दोषी आढळलेलया आरोपीवर कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

ajit pawar, eknath shinde, dhananjay munde
Shivsena News : अशोक चव्हाणांच्या नांदेडमध्ये पक्षवाढीचे 'शिवधनुष्य' संजय शिरसाटांना पेलवणार का?

शिवसेनेकडून (Shivsena) ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यात आक्रमकपणे आंदोलन करण्यात आले. शिवसेना पक्षाच्या मुख्यालयातूनच आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये वाल्मीक कराड यांच्या नावाचा उल्लेख करीत फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

ajit pawar, eknath shinde, dhananjay munde
Eknath Shinde Politics: महायुतीचे घटक पक्षच धनंजय मुंडेंच्या विरोधात, वाल्मीक कराडला दिली प्रतिकात्मक फाशी!

संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या आहेत. याच प्रकरणावरून आरोप केले जात असल्याने मंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच शिवसेनेने आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी या संपूर्ण हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, आरोपी कोणाची कार्यकर्ते असले तरी त्यांची गय करू नये, त्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केले आहे.

ajit pawar, eknath shinde, dhananjay munde
Eknath Shinde Decision : अडचणीत सापडलेल्या महायुती सरकारसाठी आणखी एक धक्का; एकनाथ शिंदेंनी अधिवेशनकाळातच घेतला 'हा' मोठा निर्णय

महायुतीमध्ये सरकारस्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला भाजपने जास्त महत्व दिले होते. त्यामुळे शिवसेनेची यावरून उघडपणे नाराजी होती. मात्र, अजित पवार यांच्या जवळचे मंत्री अशी ओळख असलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोप केले जात असल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे या प्रकरणामुळे अजित पवार गट थोडासा बॅकफुटवर गेला आहे. हे लक्षात येताच शिंदेच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

ajit pawar, eknath shinde, dhananjay munde
Mahayuti Scam : धक्कादायक! बांधकाम कामगारांच्या किटवर श्रीमंतांचा डल्ला? शिंदे सरकारचा घोटाळा येणार बाहेर

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, भाजपचे आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर यांनी प्रकरण लावून धरले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे अखेर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. या बसलेल्या धक्क्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आली आहे. तर दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेने आंदोलन करीत संधी मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी केली आहे.

मस्साजोग सरपंच देशमुख याची हत्या अतिशय संतापजनक आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारीला कधीही पोलिसांकडून सूट मिळता कामा नये. पोलिसांनी याबाबत गंभीर कारवाई केली पाहिजे. हे आंदोलन कुठल्याही पक्षाच्या विरोधात नसून गुन्हेगारी विरोधात आहेत. राज्यात घडणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या गुन्हेगारीचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात येत असल्याचे दावा एकनाथ शिंदे शिवसेनेकडून केला जात आहे.

ajit pawar, eknath shinde, dhananjay munde
Hasan Mushrif : मुश्रीफांवरील महायुतीच्या नेत्यांचा कुटील डाव यशस्वी; आधी मित्राने, तर आता सहकाऱ्यांनी केला गेम

संतोष देशमुख हत्याप्रकरणीतील व्हिडिओ तसेच फोटो समाज माध्यमांवर सगळीकडे व्हायरल झाले. त्यावर अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्याच्या अनेक भागात त्याचा निषेध नोंदवत आंदोलन झाले. बीड प्रकरणावरून महायुतीच्या विरोधात राजकीय वातावरण पेटविण्यासाठी विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रयत्न सुरु होते. मात्र, सध्या महायुतीतील घटक पक्षच बीड प्रकरणावरून आक्रमक झाल्याचे चित्र आहे. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातील वातावरणाचा फायदा इतर पक्षांना होऊ नये, अशी भूमिका देखील शिंदेंच्या शिवसेनेची असू शकते, त्यामुळे येत्या काळात या प्रकरणावरून शिवसेना काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ajit pawar, eknath shinde, dhananjay munde
Kolhapur News : पोलीस ठाण्यात बोलावले, ताकीद दिली, तरीही शिवप्रेमी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणारच !

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com