Uday Samant on Vidhan sabha Election : खासदार वर्षा गायकवाड यांनी महिलेला मुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी, असे सांगून आधीच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादात आणखीच भर घातल्याचे दिसत आहे. तर शरद पवार यांनी संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री करू असे सांगून, ठाकरे गटाचा उद्धव ठाकरेंबाबतचा दावा आधीच खोडून टाकला आहे. याकडे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लक्ष वेधून महाविकास आघाडीत बेबनाव असल्याचे म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवारावरून 15 दिवसांपूर्वीच शरद पवार(Sharad Pawar) यांनी महत्त्वाचे वक्तव्य करून एका दगडात तीन पक्षी मारले आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट होते. त्यामुळे आघाडीत आता अधिकाधिक आमदार निवडून आणण्याची स्पर्धा लागली आहे.
मात्र महाविकास आघाडीने कितीही प्रयत्न केले तरी त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही. महायुतीचेच सरकार पुन्हा राज्यात स्थापन होणार आहे. दोन महिन्यानंतर हे स्पष्टच होणार आहे. तिसरी, चौथी आघाडी झाली तरी महाविकास आघाडीचा पराभव अटळ आहे. सर्वांना आघाड्या स्थापन करण्याचा अधिकार आहे. असा टोलाही उदय सामंत(Uday Samant) यांनी लगावला.
याशिवाय, महायुतीत जागवाटपाची काही अडचण नाही. ८० टक्के जागांवर आमचे एकमत झाले आहे. तीनही पक्षांना सन्मानजनक जागा मिळणार आहे. भाजपने(BJP) १६० जागांवर दावा सांगितला आहे याकडे लक्ष वेधले असता. उदय सामंत यांनी आकड्यांवर बोलणे टाळले. महायुतीच्या नेत्यांनी बेताल वक्तव्य करू नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
तर विदर्भात किती उद्योग आले याबद्दल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) याचे लक्ष नाही. नागपूर अमरावती पूर्व आणि पश्चिम विदर्भात अनेक प्रकल्प उद्योगांना आणण्यात सरकार यशस्वी झालेले आहे. नागपूरमधून कुठलाही उद्योग इतर राज्यात गेला नाही. महायुतीच्या काळात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचा दावाही यावेळी उद्योगमंत्री उदय सावंत यांनी केला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.